Sanjay Raut | संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

Sanjay Raut | संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप
sanjay raut

पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 13, 2021 | 7:41 AM

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत (Delhi) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत (Deepti Rawat) यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा” असं राऊत म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

शरद पवार (Sharad Pawar) यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“शरद पवारच काय, तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. आम्ही मांडी घालून बसतो. पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही. पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता, तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती. राजकारणात मतभेद असतील, तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत. ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता.

शिवसेनाप्रमुखांचे संस्कार

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरू आहेत. त्यांनीच मला हा संस्कार दिला आहे. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा. अशाने तुमचं महाराष्ट्रात कधीच राज्य येणार नाही. ही विकृती आहे. तुमच्या डोक्यातील हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्या डंपिंगमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. हे तुम्हाला मी आता सांगतो. पवारांसारख्या उंचीचे लोकं देशात आहे. त्यांना खुर्ची देणं यात काही वावगं नाही. हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले होते.

संजय राऊत यांचं ट्वीट

संजय राऊत यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्याच वेळी संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून Xतिया या शब्दाचा अर्थ सांगितला. आसाममध्ये हे आडनावच असल्याचं या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: शरद पवारांना खुर्ची दिली, संजय राऊत ट्रोल; राऊत म्हणतात, XXगिरी बंद करा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें