महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

महसूल रेकॉर्ड बघा, त्यावर महाराष्ट्राचीच मालकी आहे," असे संजय राऊतांनी सांगितले. (Sanjay Raut comment on Kanjurmarg Metro Carshed)

महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल
Namrata Patil

|

Nov 04, 2020 | 11:55 AM

मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईतील इंच इंच जमिनीवर राज्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्राचे नाव हवे, मग त्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा ही आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला होता. यावरुन संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Sanjay Raut comment on Kanjurmarg Metro Carshed)

“मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईतील इंच इंच जागेवर महाराष्ट्राचा अधिकार आहे. हा महाराष्ट्र सरकारचा आदेश आहे. या केंद्राने दखल देण्याची गरज नाही. ही आमची भूमी आहे. केंद्र सरकार काहीही करो, मेट्रो कारशेड होणारच,” असे संजय राऊत म्हणाले.

“मिठागारांना राज्य सरकारने जागा दिली आहे. त्यामुळे मेट्रोसंबंधी केंद्र आणि राज्य सरकार असा संघर्ष नाही. मुंबईतील इंच इंच जमिनीवर राज्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्राचेच नाव हवे. मग महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव कसे?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

“मुंबई मेट्रोच्या प्रकरणात केंद्राने का पडावे? महसूल रेकॉर्ड बघा, त्यावर महाराष्ट्राचीच मालकी आहे,” असेही संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान याप्रकरणी संजय राऊत यांनी ट्वीट करत केंद्रावर टीका केली होती. “महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र!!,” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut comment on Kanjurmarg Metro Carshed)

संबंधित बातम्या : 

Metro carshed | अल्प बुद्धी दिसतेच आहे, अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेच्या महिला आमदाराचा टोला

मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, विकास रोखण्याचे षडयंत्र एकजुटीने उधळून लावूया, संजय राऊतांचा घणाघात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें