Video : संभाजीराजे छत्रपतींना भाजपनं संधी नाकारली? संजय राऊतांच्या बॅटींगनंतर राज्यसभेत संधी, नेमकं काय घडलं?

आज राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजपचे सहयोगी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले होते!

Video : संभाजीराजे छत्रपतींना भाजपनं संधी नाकारली? संजय राऊतांच्या बॅटींगनंतर राज्यसभेत संधी, नेमकं काय घडलं?
खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय राऊत

नवी दिल्ली : 102 व्या घटनादुरूस्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करणारे 127 वे दुरूस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ आज राज्यसभेतही पारित झालं. या पार्श्वभूमीवर आता एखादा समाज मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असण्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. दरम्यान, आज राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजपचे सहयोगी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले होते! (MP Sanjay Raut is aggressive to allow MP Sambhaji Raje to speak in the Rajya Sabha)

राज्यसभेत नेमकं काय घडलं?

127 वे दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत ते मांडण्यात आलं. यावेळी आरक्षण विधेयकावर खथासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू न दिल्यानं आज राज्यसभेत जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. रितसर विनंती करुनही भाजपच्या यादीत वक्ता म्हणून संभाजीराजे यांचं नाव नव्हतं. सभागृहात चर्चा संपत असताना विरोधी पक्षनेते बोलण्यासाठी संभाजीराजे उठून उभे राहिले आणि त्यांनी निषेध नोंदवला.

महत्वाची बाब म्हणजे यावेळी शिवसेनचे खासदार संजय राऊत संभाजीराजे यांच्या समर्थनासाठी उठून उभे राहिले आणि त्यांनी संभाजीराजे यांना बोलू देण्यासाठी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे राज्यसभेत आज भाजपच्या सहयोगी खासदारांना बोलू देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरल्याचं दिसून आल्याचं गमतीशीर चित्र सभागृहात पाहायला मिळालं. शाहू महाराजांचा वंशज आहे. ज्यांनी देशात पहिलं आरक्षण दिलं असं सांगत संभाजीराजेंनी दोन मिनिटे बोलू द्यावं अशी विनंती केली. त्यानंतर तालिका सभापतींनी अखेर त्यांना 2 मिनिटांची वेळ दिली.

खासदार संजय राऊत आक्रमक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि बंदुका घेऊन लढत आलो आहोत. तागडी आणि तराजू कधीच आमच्या हातात आलं नाही, असं सांगतानाच आम्ही सामाजिक न्यायाची आस घेऊन आलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

संभाजीराजेंचीही तीच भावना

खासगदार संभाजी छत्रपती या सभागृहात बसले आहेत. ते या आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावर जावी ही त्यांचीही भावना, त्यामुळे सरकारने सर्वांच्याच भावानांचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल

50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याविरोधात भाजपचं मतदान, भाजप आरक्षणविरोधी असल्याचं उघड; राऊतांचा घणाघात

MP Sanjay Raut is aggressive to allow MP Sambhaji Raje to speak in the Rajya Sabha

Published On - 8:38 pm, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI