सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. (gajanan kirtikar)

सरकारने आजारी माणसाला गोळी दिली, पण अर्धीच; घटना दुरुस्ती विधेयकावरून किर्तीकरांचा हल्लाबोल
गजानन किर्तीकर, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 3:25 PM

नवी दिल्ली: शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. सरकारने आजारी माणसाला गोळी दिली. पण ती अर्धीच दिली. मग तो बरा कसा होणार?, अशा शब्दात गजानन किर्तीकर यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. (gajanan kirtikar attacks bjp over 127th Constitution Amendment Bill)

शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी गजानन किर्तीकर यांनीही भाजपला घेरलं. केंद्र सरकारने केवळ नोंद घेतली म्हणून ही घटना दुरुस्ती होत आहे. आजारी माणसाला पूर्ण गोळी न देता अर्धीच गोळी देण्यात आली आहे. इंदिरा सहानी प्रकरणी जो निर्णय देण्यात आला होता. त्याला छेद देता आला असता. पण काल त्यावर काहीच निर्णय झाला नाही. परंतु, आमचं जे कर्तव्य होतं त्यानुसार आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे, असं किर्तीकर यांनी सांगितलं.

तोंडाला पाने पुसली

आम्ही कुणाला किती टक्के आरक्षण द्यावं याची मागणी केली नाही. आरक्षणाची जी मर्यादा आहे. त्यामुळे आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. शिवसेना दुटप्पी नाही. भाजपने मराठा आणि ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या विधेयकातून केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो, असं ते म्हणाले.

अधिकार केंद्राकडेच होता

तर, भाजपकडून कालपर्यंत महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात होते. राज्याकडेच आरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कालच्या घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्राकडेच होते हे सिद्ध झालं आहे. काल आम्हीही दुरुस्ती सूचवली. पण आमच्या दुरुस्तीला भाजप खासदारांनी समर्थन दिलं नाही, असं खासदार अरविंद सावंत म्हणाले.

भाजप गप्प होती

खासदार विनायक राऊत यांनीही भाजपवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने आणलेलं 102वं घटना दुरुस्ती हे विधेयक अपुरं असल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत, अशी सूचना आम्ही केली होती. आम्ही जी दुरुस्ती सूचवली होती. ती संसदेत मताला टाकली असता काँग्रेससह इतर पक्षांनी तिला पाठिंबा दिला. एकूण 71 खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. पण भाजपने विरोध केला. रावसाहेब दानवे काल तिथे होते. कोणत्याही परिस्थिीत भाजपच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देईल असं सांगणारे दानवे तोंड गप्प करून बसले होते, अशी टीका राऊत यांनी केली. (gajanan kirtikar attacks bjp over 127th Constitution Amendment Bill)

संबंधित बातम्या:

आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?; विनायक राऊत बरसले

50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याविरोधात भाजपचं मतदान, भाजप आरक्षणविरोधी असल्याचं उघड; राऊतांचा घणाघात

हा तर भिजलेला फटका, तुम्ही खेळ का करताय? थेट 50 टक्क्यांची मर्यादा उठवा, राऊतांचा हल्लाबोल सुरूच

(gajanan kirtikar attacks bjp over 127th Constitution Amendment Bill)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.