VIDEO | लेकीच्या लग्नात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स, मग सुप्रियांनी लाजऱ्या वधूमाईलाही नाचायला बोलावलं

संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी डान्सनंतर वधूमाय वर्षा राऊत यांनाही बोलावलं. त्यानंतर लाजऱ्या-बुजऱ्या वर्षा राऊतांनी पतीसह डान्स केला. अनेकांनी दोघांच्या डान्सची तारीफ केली आहे.

VIDEO | लेकीच्या लग्नात संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स, मग सुप्रियांनी लाजऱ्या वधूमाईलाही नाचायला बोलावलं
संजय राऊत-सुप्रिया सुळे यांचा डान्स

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut Wedding) विवाहबंधनात अडकत आहे. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्स लक्ष वेधून घेत आहेत.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.

संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी डान्सनंतर वधूमाय वर्षा राऊत यांनाही बोलावलं. त्यानंतर लाजऱ्या-बुजऱ्या वर्षा राऊतांनी पतीसह डान्स केला. अनेकांनी दोघांच्या डान्सची तारीफ केली आहे.

पाहा व्हिडीओ :

राऊत बंधू भावनावश

लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी गाणी सादर केली. यावेळी संजय राऊत यांच्या डोळ्यासमोरुन लेकीचं बालपण तरळून गेलं असावं. कारण संजय राऊत, सुनिल राऊत आणि संदीप राऊत हे तिघेही भाऊ काहीसे भावूक झाले होते.

लेकीचे लाड पुरवण्यात बाप व्यस्त

सध्या राजकाणातील मुसद्दी नेता म्हणून ओळख असलेले राऊतही आपल्या लेकीचा हट्ट पुरवण्यात तिचा लाड करण्यात व्यस्त आहेत. ते आपल्या मुलीला आनंदाने मिठीत घेताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी स्पष्टपणे दिसत आहे. एवढंच नाही तर संजय राऊत आपल्या मुलीच्या चेहळ्यावरील हा आनंद आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात दंग झाले आहेत. लेक बसलेली असता कसलाही संकोच न बाळगता राऊत पूर्वशीचा फोटो काढत आहेत. लेकीचं हसू पाहून त्यांचही मन ओथंबल्याचं दिसतंय.

कोण आहेत संजय राऊतांचे व्याही?

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.

संबंधित बातम्या :

दाटून कंठ येतो, ‘रोखठोक’ बाप लेकीच्या लग्नात हळवा, राहुल देशपांडेंच्या गाण्यानंतर राऊत बंधू भावूक

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई ! लेकीचं हास्य टिपण्यासाठी ‘किंगमेकर’ बनला फोटोग्राफर

संजय राऊतांच्या घरी सनई-चौघडे, मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं राज्यपाल कोश्यारींना निमंत्रण

Published On - 12:40 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI