AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेना-भाजप काँग्रेसवाल्यांसाठी ‘पाळणाघर’ होऊ नये : शिवसेना

मुंबई : “भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी”, असे मत शिवसेनेने व्यक्त केले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसचा […]

सेना-भाजप काँग्रेसवाल्यांसाठी ‘पाळणाघर’ होऊ नये : शिवसेना
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : “भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी”, असे मत शिवसेनेने व्यक्त केले.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर सुजय यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालाली आहे, याच मुद्यावर गुरुवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली.

“उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तरीही तरुण तडफदार सुजय विखे-पाटील यांच्या नव्या कारकीर्दीस आम्ही शुभेच्छा देत आहोत. तुम्ही आलात, आनंद आहे”, असेही शिवसेना म्हणाली.

“विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वडिलांच्या, कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन आपण हा निर्णय घेतल्याचे छोट्या विखे-पाटलांनी जाहीर केले. चिरंजीव विखे-पाटलांना पडेल ती किंमत देऊन खासदार व्हायचेच आहे व आल्या आल्या त्यांना नगरमधून भाजपची उमेदवारी मिळेल असे संकेत आहेत. सुजय यांच्यामुळे भाजप पॉवरफुल झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. सुजयपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादी वगैरे पक्षांतील अनेकजण भाजपच्या दारात रांगा लावून उभे आहेत व त्याचा आनंद मुख्यमंत्री व इतर मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत आहे”, असे सामनात म्हटले गेले.

“चंद्रकांतदादा पाटील यांनी अशीही घोषणा केली आहे की, राज्यात सात-आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल. चंद्रकांत पाटील यांच्या या संभाव्य भूकंपाच्या घोषणेनंतर राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन सतर्क झाले असेल. या भूकंपाचा केंद्रबिंदू नक्की कुठे आहे, भूगर्भातील हालचाली कुठे व कशा सुरू आहेत याचा अंदाज येत्या काही दिवसांत येईल. विखे-पाटील घराण्याप्रमाणे मोठी राजकीय घराणी भाजपच्या व भाजप हा काँग्रेस विचारधारेच्या पायावर उभा राहिलेला एक मोठा पक्ष बनेल. त्या दिशेने हिंदुत्ववादी विचाराचे धुरीण कामास लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असेल तर ते चुकीचे आहे. याच दरम्यान अकलूजच्या मोहिते-पाटलांची धाकटी पाती रणजितसिंह हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी भाजपच्या मंत्र्यांना भेटले व हे घराणेसुद्धा भाजपच्या जाळय़ात फसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या”, असा टोमणाही सामनातून लगावला.

“काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढे जायचे असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचे?”, असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला.

“भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. काँग्रेस संस्कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी कालच टीका केली आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांना पर्यायी शब्द असल्याचे मोदी यांचे म्हणणे आहे. दुसरे असे की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘इनकमिंग’ आज लाभदायक वाटत असले तरी पुढे ते  तापदायक ठरू शकते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे”, असा इशाराही शिवसेनेने दिला.

“सत्ता आहे म्हणून आज लोक येतात व सत्ता जाताच दुसरा घरोबा शोधतात. आज शिवसेनेवर टीका करणारे राधाकृष्ण विखे-पाटील कधीकाळी शिवसेनेत होते व पितापुत्रांना एकाच वेळी केंद्रात व महाराष्ट्रात मंत्रीपदे फक्त शिवसेनेनेच दिली होती, पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली. राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते असतानाही कधी विरोधी पक्षनेत्यासारखे वागले नाहीत. शिवसेनेने जेवढा ताठ बाणा सत्तेत राहूनही दाखवला त्याच्या कणभरही त्यांनी दाखवला नाही. उलट सत्तेत राहून विरोध करता म्हणून शिवसेनेकडे राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विखे-पाटलांवर आता नैतिकतेच्या मुद्द्यांवर राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे”, असे म्हणत राधाकृष्ण विखे-पाटीलांवरही शिवसेनेने निशाणा साधला.

“ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्मवाक्य नव्हे. ही काही संगीत किंवा गायकीची घराणी नव्हंत. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडे असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळे आपली माणसे आणि मूळ विचारच खरा. तात्पुरती सूज काय कामाची?”, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले गेले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...