महाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू

शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात संसदेबाहेर भेट (sanjay raut sharad pawar meet)  झाली. यावेळी पवार आणि राऊत यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे.

sanjay raut sharad pawar meet, महाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू

नवी दिल्ली : महाविकासआघाडीने राज्यात सत्तास्थापन केल्यानंतर आता सर्व नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले (sanjay raut sharad pawar meet) आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार, कुठल्या प्रदेशातून कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात संसदेबाहेर भेट (sanjay raut sharad pawar meet)  झाली. यावेळी पवार आणि राऊत यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याचे बोललं जात (sanjay raut sharad pawar meet) आहे.

sanjay raut sharad pawar meet, महाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू

शरद पवार आणि संजय राऊत यांची आज (5 डिसेंबर) दिल्लीत संसद भवनाबाहेर भेट झाली. या भेटीनंतर हे दोन्ही नेते घाईघाईत निघून गेले. दिल्लीत संसदेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झालं. त्यानतंर 11 वाजून 5 मिनिटांनी शरद पवार आणि संजय राऊत संसदेबाहेर पडले. ते बाहेर पडत असतानाचे काही फोटोही व्हायरल झालेत. यानंतर संजय राऊत शरद पवार यांच्या गाडीत बसून निघाले. विशेष म्हणजे त्याचवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही संसदेतून बाहेर पडल्या.

sanjay raut sharad pawar meet, महाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू

यामुळे शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारात नेमका कधी होणार, यात कोणाकोणाची वर्णी लागणार, कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट (sanjay raut sharad pawar meet) होणार आहे.

sanjay raut sharad pawar meet, महाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम ही तीन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. राष्ट्रवादीला एकूण 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदं मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काँग्रेसला महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय ही मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या वाट्याला रस्ते विकास, आरोग्य यासारख्या मंत्रिपदांचा कार्यभार येऊ शकतो.

sanjay raut sharad pawar meet, महाविकासआघाडीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध, संसदेबाहेरही संजय राऊत-शरद पवारांमध्ये गुफ्तगू

तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सहा मंत्रीच दिसतील. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची (sanjay raut sharad pawar meet) शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *