शिवसेनेचा याआधी तीन वेळा काँग्रेसला पाठिंबा!

काँग्रेसला पाठिंबा देण्यावरुन तळ्यात-मळ्यात असलेल्या शिवसेनेने याआधी तीन वेळा काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे.

शिवसेनेचा याआधी तीन वेळा काँग्रेसला पाठिंबा!

मुंबई : सत्तास्थापनेचा दावा करण्याची संधी आता राष्ट्रवादीच्या कोर्टात आहे. राष्ट्रवादी संख्याबळाची जुळवाजुळव करण्यात यशस्वी होणार का? शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देऊन ‘महासेनाआघाडी’चं सरकार अस्तित्वात येणार का? की महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे होणार? हे काही तासात स्पष्ट होईल. परंतु काँग्रेसला पाठिंबा देण्यावरुन तळ्यात-मळ्यात असलेल्या शिवसेनेने याआधी तीन वेळा काँग्रेसला पाठिंबा (Shivsena Supporting Congress History) दिलेला आहे.

काँग्रेस आणि शिवसेना हे परस्परविरोधी विचारधारा असलेले पक्ष आहेत. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या इराद्याने दोन्ही पक्ष हातमिळवणी करु शकतात. काँग्रेस आणि शिवसेना यांनी गळ्यात गळे घालून सरकार चालवण्याची कल्पनाच अनेकांना आश्चर्यकारक वाटते. परंतु शिवसेनेने याआधी तीन वेळा काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

बाळासाहेबांचा इंदिरा गांधींना पाठिंबा

31 ऑगस्ट 1975 रोजी ‘मार्मिक’ च्या अग्रलेखातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीला पाठिंबा दिला. देशात अशांतता असल्यामुळे आणीबाणी लादण्याशिवाय इंदिरा गांधींकडे पर्याय नव्हता, असं बाळासाहेब ठाकरेंनी (Shivsena Supporting Congress History) लिहिलं होतं.

मराठमोळ्या राष्ट्रपतींना पाठिंबा

2007 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यावेळी भैरोसिंह शेखावत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार होते. मात्र प्रतिभाताई मराठी असल्याच्या कारणावरुन सेनेने त्यांना पाठिंबा दर्शवला होता.

11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्ष, महामंडळामध्ये वाटा, काँग्रेसच्या शिवसेनेसमोर 12 अटी

2012 मध्येही शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्याच निवडणुकीत भाजपला न जुमानता यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमा पराभूत झाले होते.

काँग्रेसचं शिवसेनेशी गूळपीठ

वसंतसेना

वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा शिवसेनेचा अजेंडा उचलून धरल्या. त्यामुळेच शिवसेनेला ‘वसंतसेना’ म्हटलं जायचं. बाळासाहेब ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात पुकारलेल्या मोहिमेचा काँग्रेसला मोठा फायदा झाला.

आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसावा, हे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करता यावं, म्हणून काँग्रेस पाठिंबा देणार का, हे पाहणं (Shivsena Supporting Congress History) उत्सुकतेचं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI