AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी, तर सचिवपदी पराग डाकेंची निवड

खासदार अरविंद सावंत यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागली आहे. तर आमदार भास्कर जाधव यांच्या खांद्यावरही पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सचिवपदी पराग लीलाधर डाकेंची निवड करण्यात आली आहे.

अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी, तर सचिवपदी पराग डाकेंची निवड
| Updated on: Aug 28, 2022 | 2:00 PM
Share

मुंबई : शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जोर दिसतोय. ते सध्या पक्षात काही अंतर्गत बदल करत आहेत. ‘मातोश्री’ प्रतिनिष्ठा बाळगून असलेल्या नेत्यांना त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीवर घेतलं आहे. शिंदेगटाच्या बंडावेशी आक्रमक आणि रोखठोक शैलीत उत्तरं देणाऱ्या खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागली आहे. तर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या खांद्यावरही पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सचिवपदी पराग लीलाधर डाकेंची (Parag Liladhar Dake) निवड करण्यात आली आहे.

किशोरी पेडणेकरांकडून अभिनंदन

खासदार अरविंद सावंत भाई व आमदार भास्कर जाधवजी यांची ‘शिवसेना नेते’ पदी तसेच पराग लिलाधर डाके जी यांची शिवसेनेच्या ‘सचिव’ पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

अरविंद सावंत कोण आहेत?

अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार आहेत. 1995 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ पक्षासाठी झोकून दिलं. 1996 मध्ये अरविंद सावंत विधानपरिषदेवर आमदारपदी निवडून आले. 2010 मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून बढती मिळाली. 2014 मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी शड्डू ठोकला होता. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता. परंतु देवरांचा तब्बल एक लाख 20 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव करुन ते खासदारपदी निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते अवजड उद्योग मंत्री होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते शिवसेनेचे एकमेव मंत्री होते. हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद शिवसेनेकडे होतं. 166 दिवस अवजड उद्योग मंत्रालयाचा भार सांभाळल्यानंतर 11 नोव्हेंबर 2019 त्यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार होत असताना भाजपसोबत काडी मोड घेण्यात आला. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. आताही ते आक्रमकपणे सेनेची बाजू मांडतात.

भास्कर जाधव कोण आहेत?

भास्कर जाधव हे गुहागरचे शिवसेना आमदार आहेत. ते आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. विधिमंडळात आपल्या मुद्देसूद मांडणीने ते विरोधकांना घाम फोडतात. प्रभावी वकृत्वशैली आणि करारी बाणा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. तर सचिवपदी पराग लीलाधर डाकेंची निवड करण्यात आली आहे. ते निष्ठावंत शिवसैनिक लीलाधर डाके यांचे पूत्र होत. पगार हे देखील शिवसेना आणि मातोश्रीप्रति विशेष निष्ठा बाळगून आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.