शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा

मुंबई : शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या ‘पटक देंगे’ या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. आम्हाला कुणी लेचेपेचे समजू नये. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या, लाटा वैगरे आमच्या समोर नको, ही आमची भगवी लाट आहे. काहीजण काम न करता टिमकी वाजवतात, छत्रपतींचं नाव घेऊन खोटं […]

शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या ‘पटक देंगे’ या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. आम्हाला कुणी लेचेपेचे समजू नये. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या, लाटा वैगरे आमच्या समोर नको, ही आमची भगवी लाट आहे. काहीजण काम न करता टिमकी वाजवतात, छत्रपतींचं नाव घेऊन खोटं बोलतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

मुंबईच्या वरळी येथे आयोजित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर अनेक मुद्द्यांवरुन टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्या देशाचे काय होणार हा प्रश्न सध्या कुणालाही पडलेला नाही. मला मतदानाच्या निकालापेक्षा माझ्या देशाचे काय होईल याची चिंता आहे. एकवेळ सरकार मजबूर नसले तरी चालेल, पण माझा देश मजबूत असला पाहिजे.”

राम मंदिराच्या मुद्दयावरुन आम्ही युती केली होती. मात्र 15  लाख रूपये खात्यात जमा होतील हा जुमला होता, अच्छे दिन हा जुमला होता, मग राम मंदिराचा मुद्दाही निवडणुकीसाठी जुमलाच आहे का? असा घाणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे

– लोकाधिकारचा मावळा हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय परतत नाही

– काही जण काही काम न करता नुसती टिमकी वाजवतात

– पुढची सर्व वर्ष आपली असणार

– शेतकऱ्याला प्रमाण पत्र मिळालं पण कर्ज मिळालं नाही, हे मी उघड केल्यानंतर चार ते पाच तासात असा काय दणका बसला की मुंबईमधून हलचाली झाल्या आणि त्याच्या खात्यात पैसे जमा झाले

– माझ्या देशाचे काय होणार हा प्रश्न सध्या कुणाला पडलेला नाही. मला मतदानाच्या निकाला पेक्षा माझ्या देशाचे काय होईल याची चिंता आहे

– एकवेळ सरकार सरकार मजबूर नसले, तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे

– शिवसेनेला पटकणार कोणी पैदा झाला नाही

– लाटा वैगरे आमच्या समोर नको ही आमची भगवी लाट आहे

काय म्हणाले होते अमित शाह? 

‘युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) अस्मान दाखवू’, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. मराठवाड्यातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शाहांनी युतीच्या संभ्रमात राहू नका, असं स्पष्ट केलं होतं. यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.