गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे धोरण आखले आहे. | vaishali mhade NCP

गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 12:47 PM

मुंबई: सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे (vaishali mhade)या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.(singer vaishali mhade will join NCP on 31st March)

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैशाली माडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येणार आहे. वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्याने वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. त्यानंतर बिग बॉस या कार्य़क्रमामुळेही वैशाली माडे प्रचंड चर्चेत होत्या. त्यांच्या या लोकप्रियतेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षविस्तारासाठी फायदा होऊ शकतो.

‘मराठी सारेगमपा’मुळे प्रकाशझोतात

वैशाली माडे हे आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायकांपैकी एक नाव आहे. आतापर्यंत वैशाली माडे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. 2008 मध्ये वैशाली माडे ‘झी मराठी’च्या मराठी ‘सा रे ग म प’च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या होत्या. त्यानंतर वैशाली माडे यांनी 2009 मध्ये ‘झी’च्या हिंदी ‘सा रे ग म प’च्या किताबावरही आपले नाव कोरले होते.

(singer vaishali mhade will join NCP on 31st March)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.