Dhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम !

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Dhawal singh Mohite Patil Join Congress)

Dhawal singh Mohite Patil Join Congress | धवलसिंहांचा काँग्रेस प्रवेश, बिबट्या आणि गेम !
बाळासाहेब थोरात, धवलसिंह मोहिते पाटील, धीरज देशमुख
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:06 PM

मुंबई : भाजपाचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकारमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, धीरज देशमुख हे नेते उपस्थित होते. (Solapur DR. Dhawal singh Mohite Patil Join Congress After Unhappy With Sharad Pawar)

डॉ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र राष्ट्रवादीने आपली दखल न घेतल्याची खंत व्यक्त करत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात हाती धरण्याचा निर्णय घेतला. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

भलेभले संपतील पण कॉंग्रेस संपणार नाही – धीरज देशमुख

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांना वडील आणि माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आठवण आली.

“काँग्रेसचे विचार कधी संपणार नाही, असे विलासराव नेहमी म्हणत होते. भलेभले संपणार पण कॉंग्रेस संपणार नाही, असे विलासराव देशमुख नेहमी सांगायचे. धवलसिंह मोहित पाटील यांच्याकडून कॉंग्रेसला बळ मिळणार आहे. सोलापूरमध्ये कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केले, त्याचप्रकारे ते भाजपाचा शिकार करतील,” अशी प्रतिक्रिया धीरज देशमुख यांनी दिली.

धवलसिंहांनी बिबट्या मारला, हे मला आजच कळलं – बाळासाहेब थोरात

“धवलसिंग मोहिते पाटील हे कार्यशील आहेत. धवलसिंग मोहित पाटील मदतीला धावून येणारे आहेत. त्यांनी बिबट्या मारला ते मला आजच कळाले. माणूसकी संपली की धवलसिंग त्यांचा गेम करतात. आता भाजपाचे काही खरे नाही धीरज देशमुख यांचे मी आभार मानतो. कॉंग्रेस कठीण परिस्थितीमधून खूप वेळा गेला आहे. आज आपण अडचणाीत आहेत. पण काँग्रेस पुन्हा एकदा उभी राहिलं,” अशी प्रतिक्रिया बाळसाहेब थोरात यांनी दिली. (Solapur DR. Dhawal singh Mohite Patil Join Congress After Unhappy With Sharad Pawar)

“स्थिर रहा आपलं भविष्य उज्वल असेल. धवलसिंग यांनी ठरवावे खासदार व्हायंच की आमदार व्हायंच. तुमचे भवितव्य तुमच्या हातात आहे,” असेही थोरात म्हणाले.

मोहिते पाटील घराण्याला काँग्रेसचा शह

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसच्या नेत्यांना आहे. मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेस भाजपला राजकीय शह देण्याच्या प्रयत्नात आहे.

धवलसिंह मोहिते दखल न घेतल्याने नाराज

विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा प्रचारही केला होता. परंतु राष्ट्रवादीने आपली दखल घेतली नसल्याचे सांगत धवलसिंह काही महिन्यांपासून नाराज होते. त्यानंतर त्यांनी पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती.

मोहिते पाटील पितापुत्र भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता.

कोण आहेत धवलसिंह मोहिते पाटील?

  • धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत.
  • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत.
  • डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
  • भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते पुतणे आहेत. (Solapur DR. Dhawal singh Mohite Patil Join Congress After Unhappy With Sharad Pawar)

धवलसिंह मोहितेंच्या उमेदवारीची चर्चा फोल

सध्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह आणि रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. काका आणि चुलत बंधू भाजपात गेल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत धवलसिंहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न झाल्याचं बोललं जातं. धवलसिंह यांचं नाव राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं.  (Solapur DR. Dhawal singh Mohite Patil Join Congress After Unhappy With Sharad Pawar)

संबंधित बातम्या :

विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय शह, पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या वाटेवर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.