AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्थायी सभापतीची निवड प्रक्रिया सुरु, शिवसेनेचं पारडंही जड, पण ठाकरे सरकारच्याच निर्णयाचा फटका

मागील आठवड्यात सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया सुरु असताना ऐनवेळी राज्य सरकारने ती आठ दिवसांसाठी तहकूब केली होती (Solapur Standing Committee President Election)

स्थायी सभापतीची निवड प्रक्रिया सुरु, शिवसेनेचं पारडंही जड, पण ठाकरे सरकारच्याच निर्णयाचा फटका
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
| Updated on: Mar 15, 2021 | 4:13 PM
Share

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीला राज्य सरकारने दुसऱ्यांदा ब्रेक लावला. महापालिकेची 16 सदस्यीय स्थायी समिती आणि 12 सदस्यीय परिवहन समितीच राज्य सरकारने आदेश काढून बरखास्त केली. त्यामुळे आज होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पुन्हा एकदा टळली आणि इच्छुक उमेदवारांचे मनसुबे उधळून निघाले. स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड होते, मात्र ठाकरे सरकारच्या निर्णयाने सर्वांनाच झटका बसला. (Solapur Standing Committee President Election stopped after Thackeray Govt decision)

सत्ताधारी भाजपची उच्च न्यायालयात धाव

मागील आठवड्यात सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया सुरु असताना ऐनवेळी राज्य सरकारने ती आठ दिवसांसाठी तहकूब केली. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाच्या विरोधात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने आहे त्या स्थितीत निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार होती.

समसमान पक्षीय बलाबल

दुसरीकडे नव्या सभापतींसाठी गाडी आणि दालन सजवून ठेवण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरु झाली होती. स्थायी समितीत भाजपकडे आठ, तर विरोधकांकडे आठ असे समसमान पक्षीय बलाबल होते. या बैठकीला सत्ताधारी भाजपचे सात, तर शिवसेनेसह इतर पक्षाचे आठ सदस्य उपस्थित होते.

शिवसेनेचे पारडे जड

बैठकीला भाजपच्या मेनका राठोड या गैरहजर असल्याने विरोधक असलेल्या शिवसेनेचे पारडे जड होते. मात्र ऐनवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राज्य सरकारचे पत्र वाचून दाखवले आणि सभापतीपदाची स्वप्नं पाहणाऱ्या नगरसेवकांवर मागे फिरण्याची वेळ आली. (Solapur Standing Committee President Election stopped after Thackeray Govt decision)

16 सदस्यीय स्थायी समितीच बरखास्त

राज्य सरकारने 16 सदस्यीय स्थायी समितीच बरखास्त केली आहे. त्यासोबतच परिवहन समितीही बरखास्त करण्यात आली आहे. भाजपकडून अंबिका पाटील यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, तर शिवसेनेकडून अमोल शिंदे आणि मनोज शेजवाल यांनी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी दोघांपैकी एक जण माघार घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र निवडणूक रद्द करुन समितीच बरखास्त करण्याच्या निर्णयाने सर्वांच्या स्वप्नांवर पाणी फिरले.

संबंधित बातम्या :

नाशिक स्थायी समिती सभापती निवडणूक, भाजपची ‘मविआ’ला धोबीपछाड, चाव्या पुन्हा गीतेंकडेच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धास्तीने नाशकात भाजपची मनसेला टाळी

अहमदनगर महापालिकेत ट्विस्ट, सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेचा शड्डू

(Solapur Standing Committee President Election stopped after Thackeray Govt decision)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.