सोलापूर झेडपीत भाजपला मतदान, राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचं निलंबन

सोलापूर जिल्हा परिषेदतील मोहिते -पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात (Solapur ncp ZP member Suspension)  आला आहे.

सोलापूर झेडपीत भाजपला मतदान, राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचं निलंबन

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषेदतील मोहिते -पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात (Solapur ncp ZP member Suspension)  आलं आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. या जिल्हा परिषद सदस्यांनी पुरेसे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान न करता भाजप आणि समविचारी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 31 डिसेंबरला मतदान झाले होते. यात पुरेसे संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केले होते. सहा सदस्यांनी विरोधी गटाला मतदान केल्याने राष्ट्रवादी आणि महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला.

जिल्हा परिषदेतील मतदानात या सहा सदस्यांनी भाजप आणि महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. निलंबित केलेले सर्व सहा सदस्य हे माळशिरस तालुक्यातील असून स्वरूपाराणी मोहिते, शीतलदेवी धैर्यशील मोहिते, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील या सदस्यांचा यात समावेश (Solapur ncp ZP member Suspension)  आहे.

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना भाजपशी युती भोवणार, पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

दरम्यान काल (11 जानेवारी) सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याने लक्ष्मीकांत पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुरुषोत्तम बरडे यांची प्रभारी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मीकांत पाटील हे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. तसेच लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांना सहकार्य केल्याचेही बोललं जात (Solapur ncp ZP member Suspension)  आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *