AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : सोलापूर दूध संघाची निवडणूक होणारच, बिनविरोधची शक्यता धुसर ; दिग्गज नेत्यांची बैठक निष्फळ

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा दूध संघ (Solapur Dudh Sangh) निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

Solapur : सोलापूर दूध संघाची निवडणूक होणारच, बिनविरोधची शक्यता धुसर ; दिग्गज नेत्यांची बैठक निष्फळ
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 7:30 AM
Share

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा दूध संघ (Solapur Dudh Sangh) निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये येत्या काळात दूध संघ निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळेल. प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या विरोधात दूध संघ बचाब कृती समिती मैदानात उतरली आहे. प्रस्थापित सर्व पक्षीय नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही बिनविरोध निवडणुकीवर तोडगा निघालेला नाही, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी बोलावली बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही. दूध संघ बचाव कृती समितीनं यावेळी निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळं यावेळी दूध संघ निवडणूक लागणार आहे. अर्ज बाद झाल्यानं दिग्गज नेत्यांना यावेळी फटका बसलेला आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठीची बैठक अयशस्वी

आमदार बबनराव शिंदे आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी बोलावेल्या बैठकीला आमदार प्रशांत परिचारक, संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, सिध्दाराम म्हेत्रे, राजन पाटील यांची उपस्थिती दिसून आली. दिलीप सोपल यांनी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.आत्तापर्यंतची बिनविरोध करण्याची परंपरा आहे त्याच पध्दतीने आम्ही पुढे जाण्याचे ठरवले आहे. माजी आमदार दिलीप सोपल यांनी बैठकीनंतर यासंदर्भात माहिती दिली आहे.

दूधसंघ आमच्या हाती द्या

दूध संघ बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे यांनी मात्र प्रस्थापित नेत्यांनी संघ 5 वर्ष आमच्या हाती सोपवावा अशी मागणी केलीय. दूध संघ बचाव कृती समितीची ही भूमिका असल्यानं निवडणूक होणार हे आता निश्चित झालं आहे. दूध संघ बचाव कृती समितीच्या मागणीमुळे निवडणूक बिनविरोध होणे अशक्य असल्याचं स्पष्ट झालंय. 16 फेब्रुवारीपासून दूध संघ बचाव समिती प्रचार करणार आहे.

अर्ज बाद झाल्यानं दिग्गजांना धक्का

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दूध संघाच्या माजी अध्यक्षासह सहकारातील दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. कारण निवडणूक अर्ज छानणीमध्ये 26 जणांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते. त्यामुळे 26 पैकी 10 जणांनी या पुण्यातील विभागीय उपनिबंधकांकडे धाव घेतली होती. त्यांच्या अपिलावर 8 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली असून त्यांचे अर्ज बाद ठरवलेत. विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी हा निकाल दिलाय. त्यामुळे या 10 जणांना निवडणूक लढवता येणार नाही हे स्पष्ट झालेय. दरम्यान, 15 फेब्रुवारी रोजी निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. यामध्ये दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप माने, विद्यमान संचालक दिपक माळी तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे दूध संघाचे स्वप्न भंगले आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक संचालक मंडळातील 17 सदस्यांच्या निवडीसाठी होत आहे. खुल्या प्रवर्गातील बारा तर राखीव प्रवर्गातील पाच सदस्यांचा यामध्ये समावेश आहे

इतर बातम्या:

13 February 2022 Panchang | 13 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर आणि ट्रान्स हार्बरलाईनवर मेगाब्लॉक

Solpaur Dudh Sangh Election senior leaders meeting for unopposed election is unsuccessful which called by Babanrao Shinde

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.