सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे (Sonia Gandhi will be step down as congress president).

सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
चेतन पाटील

|

Aug 23, 2020 | 5:51 PM

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे (Sonia Gandhi will be step down as congress president). त्यांचा अंतरिम अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची उद्या (23 ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत कदाचित सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचीदेखील घोषणा होण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी अध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याची माहिची सूत्रांची दिली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे (Sonia Gandhi will be step down as congress president).

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे. मात्र, पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें