महाराष्ट्रातील सरकार कुणाचे? दिल्लीत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले….

महाराष्ट्रातील सरकार कुणाचे? दिल्लीत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले....

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. नाना पटोले हे दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. Nana Patole Delhi Rahul Gandhi meet

सचिन पाटील

|

May 26, 2020 | 4:31 PM

नागपूर/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट वाढत असताना, राजकीय घडामोडीही प्रचंड वेगाने घडत आहेत. (Nana Patol Delhi Rahul Gandhi meet) भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा अशी मागणी केली. त्याला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं. त्याआधी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी बैठक झाली. त्यामुळे राज्यात कोणत्या नव्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Nana Patole Delhi Rahul Gandhi meet)

अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. नाना पटोले हे दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

राज्यातील विधानसभाचे अधिवेशन सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील सरकार कोणाचे आहे, असा प्रश्न विचारला जातो. मात्र हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे. निर्णय सर्व पक्ष मिळून घेतात, त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला अधिकार नाहीत असे मत राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे, यावर मी बोलणे योग्य नाही. राज्यपालांच्या माध्यमातून सरकार पाडणे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची खेळी करणे चुकीचे आहे, असे मत नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

हे तीन पक्षांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडूनही सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं प्रत्युत्तर दिलं जात आहे.

महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी

“महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे (Rahul Gandhi on Maharashtra Government). मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यात फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज (26 मे) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. “केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्व मदत करत आहे. वेगवेगळ्या मार्गातून निधी दिला, मात्र राज्य सरकार ठोस पावलं उचलत नाही”, असं फडणवीस म्हणाले.

(Nana Patole Delhi Rahul Gandhi meet)

संबंधित बातम्या 

नारायण राणे अस्वस्थ, तापलेल्या वातावरणात सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात  

Devendra Fadnavis | राजकीय घडामोडींना वेग, देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद बोलावली 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें