राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस, वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, कॅन्सरग्रस्तांसाठी नागपुरात उभारलं मोठं रुग्णालय

| Updated on: Jul 22, 2021 | 4:28 PM

एक राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अवघा देश ओळखतो, पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस

राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस, वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, कॅन्सरग्रस्तांसाठी नागपुरात उभारलं मोठं रुग्णालय
Follow us on

नागपूर : वडिलांना कॅन्सर…मग उपचारासाठी नागपूरवरुन मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये जाणं, तिथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल. पुढे कॅन्सरने वडिलांचा मृत्यू…. अशाचप्रकारे कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी विदर्भातील लोकांना मुंबईत जावं लागू नये, म्हणून त्यांनी नागपुरात मोठं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं… हा नेता दुसरा कुणी नसून, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आहे. एक राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अवघा देश ओळखतो, पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणापलीकडचे देवेंद्र फडणवीस…, यावर ‘टीव्ही 9 मराठी’चा हा रिपोर्ट….

मध्य भारतातल्या कॅन्सर रुग्णांचा मोठा आधार

चार टर्मचे आमदार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते आणि भाजपचा राज्यातील आक्रमक चेहरा… देवेंद्र फडणवीस यांचा हा राजकीय परिचय. पण या राजकारणापलीकडेही एक आरोग्य सेवक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास विदर्भातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं. जवळपास 25 एकर कॅम्पस, 450 पेक्षा जास्त बेड, कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे आज नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूट विदर्भच नाही, तर मध्य भारतातल्या कॅन्सर रुग्णांचा मोठा आधार ठरतो आहे.

कॅन्सर सर्वात स्वस्त उपचार, देवेंद्र फडणवीस यांचा सकल्प

देशात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्यावर्षाचा देशभरातल्या कॅन्सर रुग्णांचा आकडा 12 लाख 90 हजारांपर्यंत पोहोचला आणि 2025 पर्यंत देशात वर्षाला 15 लाखांच्यावर कॅन्सर रुग्णसंख्या जाईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मध्य भारतातल्या रुग्णांना चांगल्या दर्जाचा उपचार मिळावा, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी केली. देशात कॅन्सर सर्वात स्वस्त उपचार इथे व्हावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचा सकल्प आहे.

समाजाची सेवा करणाऱ्या नेत्यांची देशात मोठी परंपरा

राजकारणात एक दुसऱ्यांवर टीका टिप्पणी, आरोप, विरोध, हेवेदावे… हे सगळं आलंच. पण राजकारणापलीकडे जाऊन समाजाची सेवा करणाऱ्या नेत्यांची या देशात मोठी परंपरा आहे. यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणापलीकडे एक आरोग्य सेवक म्हणून आपली ओळख निर्माण केलीय…. आशा करुन की भविष्यात गरीब कॅन्सर रुग्णांना देवेंद्र फडणवीस यांनी उभारलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये देशातील सर्वात स्वस्त उपचार मिळेल.

(Special Report On Devendra Fadnavis was set up large National Cancer Institute in Nagpur)

संबंधित बातम्या : 

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

Kharghar : राज्यात पर्यटन बंदी तरीही पर्यटकांची हौस, धबधब्यावर अडकलेल्या 115 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

“कुणी असो किंवा नसो, राज्याचं अर्थचक्र चालावं म्हणून कोव्हिडमध्येही मंत्रालयातील कार्यालय सुरु”, दादांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांना टोमणा