Kharghar : राज्यात पर्यटन बंदी तरीही पर्यटकांची हौस, धबधब्यावर अडकलेल्या 115 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश

खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास 115 पर्यटकांना बाहेर काढलं आहे. (Kharghar: Despite the ban on tourism in the state, 115 people rescued from Kharghar waterfall)

1/7
Khargar Waterfall Tourist
नवी मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात खारघर परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
2/7
Khargar Waterfall Tourist
दरम्यान रविवारी खारघर सेक्टर 5 येथील धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दूतर्फी भरून वाहू लागला.
3/7
Khargar Waterfall Tourist
या ओढ्याशेजारी धबधब्यावर अडकल्या पर्यटकांना अखेर सायंकाळी सातच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले.
4/7
Khargar Waterfall Tourist
खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास 115 पर्यटकांना बाहेर काढलं.
5/7
Khargar Waterfall Tourist
ओढ्यावर सीडी म्हणजेच लेडर लावून या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
6/7
Khargar Waterfall Tourist
या संपूर्ण पर्यटकांमध्ये 78 महिला, 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता.
7/7
Khargar Waterfall Tourist
महत्त्वाचं म्हणजे बंदीचे आदेश असताना सुद्धा आदेश झुगारून हे पर्यटक डोंगराळ भागात गेले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI