Shrikant Deshmukh : बलात्कार प्रकरणात श्रीकांत देशमुख यांना जामीन मंजूर, पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला
पुणे शहर पोलिसांत एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र भाजपचे नेते श्रीकांत देशमुख (52) यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोलापूर : लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप सोलापूर माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्यावरती केला होता. त्यावेळी देशमुखांना भाजपने (BJP) तात्काळ राजीनामा देण्याचे फर्मान काढले होते. तसेच देशमुख यांनी देखील तात्काळ राजीनामा दिला होता. पीडित महिलेनं देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. विशेष या प्रकरणी श्रीकांत देशमुख यांना जामीन मंजूर झाला नव्हता. पण उच्च न्यायालयानं आज अंतरीम जामीन मंजूर केला आहे. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार असल्याचे सांगितले आहे. सोलापूर (Solapur) जिल्हा सत्र न्यायालयाने 24 ऑगस्टला जामीन अर्ज फेटाळला होता. आज श्रीकांत देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. तक्रारदार महिला आणी श्रीकांत देशमुख हे एकमेकांशी अपरिचित नसल्याचं आणि ओळखीतून जवळीक वाढल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होतं अशी माहिती आशिष गायकवाड श्रीकांत देशमुख यांचे वकील यांनी दिली.
पीडीतेचे गंभीर आरोप
पुणे शहर पोलिसांत एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र भाजपचे नेते श्रीकांत देशमुख (52) यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हे प्रकरण सोलापूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. महिलेचा आणि देशमुख यांचा एक व्हिडिओ, ज्यामध्ये ती फसवणूक केल्याचा आरोप करताना दिसत होती, त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. पीडीत महिलेने ती अनेक दिवसांपासून देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे सांगत होती. देशमुख याने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि त्या बहाण्याने सोलापूर, पुणे, मुंबई आणि सांगली येथे अनेकदा तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. त्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला इजा करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे.
