AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: केंद्राप्रमाणं भत्ता, केंद्राप्रमाणं वेतन, एस.टी. कर्मचाऱ्यांबाबतचा शब्द शरद पवार पाळतील? भरसभेतला तो व्हिडीओ व्हायरल

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या भाषणाची एक क्लीपही आता समोर आलीय. यात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना करताना दिसून येतात. ते ही एसटी कर्मचाऱ्यांच्याच एका कार्यक्रमात!

Video: केंद्राप्रमाणं भत्ता, केंद्राप्रमाणं वेतन, एस.टी. कर्मचाऱ्यांबाबतचा शब्द शरद पवार पाळतील? भरसभेतला तो व्हिडीओ व्हायरल
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 11:59 PM
Share

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर मागील 15 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, बेमुदत संप सुरु आहे. मागील चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि अडचणींबाबत सर्वच राजकीय पक्ष उदासीन आहेत का? असा सवाल आता विचारला जातोय. कारण, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या भाषणाची एक क्लीपही आता समोर आलीय. यात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना करताना दिसून येतात. ते ही एसटी कर्मचाऱ्यांच्याच एका कार्यक्रमात! (Video of Sharad Pawar’s speech at ST Union convention 2020 goes viral)

शरद पवारांचे एसटी अधिवेशनातील भाषण व्हायरल

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एसटी कामगार संघटनांचं 56 व्या अधिवेशन 14 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडलं होतं. या अधिवेशात बोलताना शरद पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला पाहिजे असं मत मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना केली होती. त्यावेळी पवार म्हणाले होते की, ‘या सगळ्या कामामध्ये कर्मचाऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं. केंद्राप्रमाणं वेतन, केंद्राप्रमाण भत्ता, केंद्राप्रमाणं पेंशन. या गोष्टी आज महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात आणि नेमकी तिच स्थिती आज एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी करण्याच्याबद्दलचा निर्णय हा जर घेता आला. मग त्यांना शासकीय कर्मचारी म्हणा किंवा आणखीन काही म्हणा. दर महिन्याला त्याच्या पदरामध्ये वेळेत ते वेतन पडलं पाहिजे. आज माझ्या कानावर येतंय, की अनेक ठिकाणी दोन-दोन, तीन-तीन महिने एसटी कामगारांचं वेतन मिळत नाही हे खरं आहे का ? त्यांना 2 लोकांची मदत मिळाली पाहिजे, त्यातले 2 लोक असे आहेत की त्याची जबाबदारी एकाची त्यांनी घ्यावी, एकाची मी घेतो. त्यांनी मुख्यमंत्र्यांची घ्यावी, मी उपमुख्यमंत्र्यांची घेतो. त्यांच्याकडे राज्य आहे, यांच्याकडे अर्थ खातं आहे आणि त्यामुळं हे दोघं एकत्र आले, तुमच्या पाठीशी तर फार चिंता करण्याचं कारण नाही’.

2019 मध्ये पवारांनी फडणवीसांवर केलेली टीका

तत्पूर्वी 2019 मध्ये भाजप-शिवसेना सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना शरद पवार यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीकास्त्र डागलं होतं. त्यावेळी पवार म्हणाले होते की, 7 वा वेतन आयोग देण्याची घोषणा केली होती का ? आयोग सातवा कोणाला देतात ? सरकारी कर्मचाऱ्याला. याचा अर्थ एसटी कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे. हे अप्रत्यक्षपणानं मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी सांगितलं. किती दिवस झाले अधिवेशन होऊन, कधी झालं होतं ? अरे बाप रे 3 वर्षे झाले. 3 वर्षांत सांगितलेला शब्द अजून पाळला नाही. काय माहिती नाही, या गड्याचं असंच आहे’.

खुद्द परिवहन मंत्री काय म्हणाल होते?

एसटी कर्मचाऱ्यांचा समस्येबाबत खुद्द परिवहन मंत्री अनिल परब यांचंच एक भाषण सध्या व्हायरल होत आहे. 2020 मध्ये पार पडलेल्या एसटीच्या अधिवेशनात परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना यापुढे मागण्यांसाठी संघर्ष करावा लागणार नाही, असं वचन दिलं होतं.

मुनगंटीवारांचाही व्हिडीओ व्हायरल

दुसरीकडे काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवार यांचा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्या व्हिडीओमध्ये मुनगंटीवार एसटीचं विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगताना दिसून येत आहेत.

त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते विरोधात असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बेंबीच्या देठापासून ओरडताना दिसून आले. पण सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांनी एसटी कर्मचारी आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंचं पाहायला मिळत आहे.

इतर बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरे मैदानात, पवारांसोबत महत्वाची चर्चा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

त्रिपुरा ते महाराष्ट्र अशांतता, तणाव; राऊत म्हणतात ही तर भाजपची 2024 च्या निवडणुकीत उतरण्याची तयारी

Video of Sharad Pawar’s speech at ST Union convention 2020 goes viral

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.