“विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संपला की कामाची गती दाखवणार”

| Updated on: Nov 15, 2020 | 1:36 PM

'विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संसर्ग संपला की सरकारच्या कामाची गती दाखवणार' असे म्हणत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना चांगलंच फैलांवर घेतलं.

विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संपला की कामाची गती दाखवणार
Follow us on

सातारा : ‘विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संसर्ग संपला की सरकारच्या कामाची गती दाखवणार’ असे म्हणत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी विरोधकांना फैलांवर घेतलं. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही असे विरोधकांकडून वेळोवेळी सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते साताऱ्यात बोलत होते. (shambhuraj desai criticizes opposition leaders)

“या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष भक्कमपणानं या सरकारमध्ये सामील झालेले आहेत. शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेत्याचं मार्गदर्शन या सरकारला आहे. पूर्वी मुंगेरीलाल के हसीन सपने नावाची मालिका आपण पाहायचो, त्याप्रमाणेच विरोधकांनीही स्वप्न पाहत राहावं.” असं शंभूराज देसाई म्हणाले.

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. त्यानंतर राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर वेगवेळ्या प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

सरकार लवकरच पडणार असं विरोधकांकडून सांगितलं जातं याविषयी विचारले असता, हे सरकार भक्कमपणे काम करत राहणार असं देसाई यांनी सांगितलं. एका भक्कम विचारावर महाविकास आघाडीचं सरकर स्थापन झालं आहे. या सरकारला शिवसेनेचं नेतृत्व आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष भक्कमपणांन या सरकरामध्ये सामील आहेत. शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांचं सरकारला मार्गदर्शन आहे. पूर्वी मुंगेरीलाल के हसीन सपने नावाची मालिका वाहिनीवर पाहिली जायची त्यापमाणे विरोधकांनी स्वप्न पाहत राहावं. कोरोना संसर्ग नसता, तर हे सरकार किती वेगाने काम करतं, दिलेली आश्वासनं, वचन याला आम्ही कसे बांधील आहोत हे दाखवून दिलं असंत. पण कोरोनामुळे आर्थिक मर्यादा आल्या असं शंभूराज देसाई म्हणाले.

तसेच, कोरोनामुळे राज्याचं नियोजन बिघडलं, आम्हाला आर्थिक मर्यादा आल्या, सगळी गणितं विस्कटली. पण आम्ही डगमगलो नाही. आर्थिक घडी व्यवस्थित झाली की आम्ही आमचे काम दाखवून देऊ, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

shambhuraj desai criticizes opposition leaders

संबंधित बातम्या :

नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी : नीलम गोऱ्हे

बिहारची निवडणूक झाली, आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

नारायण राणेंनी नसती स्वप्नं पाहू नयेत, शिवसेनची स्पर्धा करण्याचे तुमचे दिवस कधीच गेले; विनायक राऊतांचा हल्लाबोल