AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकचे राजकारण बदलणार, सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे.

नाशिकचे राजकारण बदलणार, सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश
| Updated on: Jun 17, 2025 | 4:00 PM
Share

नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते.

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता, मात्र हा विरोध झुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले सुधाकर बडगुजर?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.’

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला 2007 मध्ये सुरुवात झाली. ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी बडगुजर यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2008 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते 2012 काळात ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेते होते. तसेच 2012 ते 2015 या काळात बडगुजर हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनेक गुन्हेगारी घटनांमध्येही बडगुजर यांच्यावर आरोप आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.