BJP Polkhol Abhiyan : ‘ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’, मुंबई महापालिकेसाठी मुनगंटीवारांचा नारा, शिवसेनेवर हल्लाबोल

ऑलिम्पिकमध्ये अनेकजण अनेक पदकं जिंकत असतात. भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिकमध्ये शिवसेनेला गोल्ड मेडल मिळेल, असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. इतकंच नाही तर 'ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट' असा नवा नाराच मुंनगंटीवार यांनी दिलाय.

BJP Polkhol Abhiyan : 'ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट', मुंबई महापालिकेसाठी मुनगंटीवारांचा नारा, शिवसेनेवर हल्लाबोल
सुधीर मुनगंटीवार Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:11 PM

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पोलखोल अभियानाला सुरुवात करण्यात आलीय. मुंबईत विविध भागात भाजप नेत्यांकडून सभेचं आयोजन करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्या नेतृत्वात कांदिवलीत पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. ऑलिम्पिकमध्ये अनेकजण अनेक पदकं जिंकत असतात. भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिकमध्ये शिवसेनेला गोल्ड मेडल मिळेल, असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. इतकंच नाही तर ‘ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’ असा नवा नाराच मुंनगंटीवार यांनी दिलाय.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, इंग्रजांची वृत्ती ही सोशन करण्याची होती. पण काही लोक चले गये आणि काही लोक राहिले आहेत. ऑलिम्पिकमध्ये अनेकजण अनेक पदकं जिंकत असतात. भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिकमध्ये शिवसेनेला गोल्ड मेडल मिळेल. बीएमसीच्या इमारतीत अशी फाईल दाखवा ज्या फाईलमध्ये पैसे खाल्ले गेले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती पण आताची शिवसेना ही नोटांवर चालले. मी शिवसैनिकांना आवाहन करतो बाळासाहेबांची 24 कॅरेटची शिवसेना संपली आहे. आता शिवसेना काँग्रेसच्या विचारांनी पुढे जातेय, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

शिवसेनेसोबत भविष्यातही दोस्ती नाही- मुनगंटीवार

मुंबईत भ्रष्टाचाराशिवाय काही सुरु आहे का? पेंग्विन, रस्ते काय काय चाललंय. पालिकेचं बजेट कुणाच्या बापाचं नाही. यह पेंग्विनवालोंका पैसा नहीं है. असा कोणता विषय नाही ज्यात सरकारनं पैसे खाल्ले नाहीत. मुंबईच्या रस्त्यांवर गाडी सायलेंट मोडवर चालत नाही तर व्हायब्रंट मोडवर चालते. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड ….पण कधी दार उघडलं नाहीच. तसंच फाईलींचं आहे. पैसै दिल्याशिवाय फाईल वर जातच नाही, असा आरोपही मुनगंटीवार यांनी केलाय. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची दोस्ती नाही. भविष्यात यांच्याशी दोस्ती होणार नाही, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला आहे.

अतुल भातखळकरांचाही घणाघात

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. आम्ही कुणाला छेडणार नाही. पण आम्हाला जर कुणी छेडलं नाही तर आम्ही सोडणार नाही. आम्हाला लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही निवडून दिलं आहे. आम्ही प्रश्न मांडत राहणार. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरु आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

इतर बातम्या :

Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती

Yashomati Thakur : ‘तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवणं एका डॉक्टरला शोभत नाही’, यशोमती ठाकूरांचा बोंडेंवर पलटवार

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.