‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’

'राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने'
मोदींच्या हस्ते उद्घाटन करा-भातखळकर

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.' असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 23, 2022 | 10:55 PM

मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयती आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

भातखळकर यांनी नेमके काय म्हटले?

अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एक ट्विट पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका क्रीडासंकुलाची स्वागत कमान दिसत आहे. या कमानीवर विर टिपू सुलतान क्रीडासंकुलाचे काम पालकमंत्री अस्मल शेख यांच्या निधितून झाल्याचा उल्लेख आहे. या फोटोला भातखळकर यांनी एक कॅप्शन देखील दिले आहे. ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. आता भातखळकर यांच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

‘दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पुढील वाटचाल स्पष्ट केलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Shiv sena | शिवसेनेच्या पंतप्रधानापासून भाजपच्या गद्दारीपर्यंत! उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठी वक्तव्य

‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

जमलेल्या माझ्या तमाम….! शिवसैनिकांना उद्देशून उच्चारलेला उद्धव ठाकरेंचा शब्दान शब्द.. जसाच्या तसा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें