सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत? दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित!

महाराष्ट्र विधानसभा सभागृहात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी (Maharashtra MLA Oath Ceremony) पार पडला.

सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत? दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित!
Follow us
| Updated on: Nov 27, 2019 | 1:21 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सभागृहात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी (Maharashtra MLA Oath Ceremony) पार पडला. 288 पैकी 285 आमदारांनी शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत हा शपथविधी (Maharashtra MLA Oath Ceremony) झाला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दु. 1 वा.पर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली.

कोळंबकर यांना कालच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली होती. त्यामुळे आतापर्यंत 286 आमदारांचा शपथविधी झाला. मात्र दोन आमदार अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी झाला नाही. जे दोन आमदार अनुपस्थित आहेत त्यामध्ये भाजपचं मोठं नाव असलेले सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावतीतील मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे. हे दोन्ही आमदार अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.

14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ वंदे मातरम् ने तर राष्ट्रगीताने समारोप झाला.

या दादा या : आशिष शेलार

सभागृतील ज्येष्ठ सदस्यांच्या शपथविधीने आमदारांचा शपथविधी सुरु झाला. सकाळी 8 वाजता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या शपथविधीने आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. ज्येष्ठतेनुसार विधानसभा सदस्यांनी शपथ घेतली. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे हे सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पुढच्या बाकावर बसले होते.

सभागृहात शपथविधीसाठी अजित पवारांचं नाव पुकारण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार यांनी “या दादा या” असा आवाज दिला. मात्र अजित पवारांनी कोणताही प्रतिसाद न देता, त्यांनी मौन पाळणं पसंत केलं.

सुप्रिया सुळेंकडून सर्वपक्षीय आमदारांचं स्वागत

सर्वपक्षीय नवर्निवाचित आमदारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः विधीमंडळाच्या गेटवर उभ्या होत्या. विधीमंडळात पाऊल ठेवणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं, तर मोठे बंधू अजित पवार यांना मिठी मारत त्या पाया पडल्या होत्या.

गेला महिनाभर आमदारांच्या मनात धाकधूक आणि ताण होता. तो घालवण्यासाठी आपण स्वतः विधीमंडळात आल्याचं सुप्रिया सुळेंनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.