विखे-महाजनांचा एकाच हेलिकॉप्टरमधून राजकीय खळबळ उडवणारा प्रवास

अहमदनगर : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा कायम असताना, सुजय विखे पाटील यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत. नगरहून आज भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील हे एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. कोणत्या कारणासाठी दोघेजण एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत आहेत, हे स्पष्ट …

विखे-महाजनांचा एकाच हेलिकॉप्टरमधून राजकीय खळबळ उडवणारा प्रवास

अहमदनगर : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा कायम असताना, सुजय विखे पाटील यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत. नगरहून आज भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील हे एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. कोणत्या कारणासाठी दोघेजण एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत आहेत, हे स्पष्ट नसलं, तरी या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी इतर पक्षांतून तिकिटासाठी चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.

दक्षिण नगरच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे आघाडीत ज्या दोन-तीन जागांबाबत अद्याप तिढा आहे, त्यात दक्षिण नगरच्या जागेचा समावेश आहे. किंबहुना, याच जागेवरुन सर्वाधिक तिढा आहे. त्यात थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *