राज्यातील बहुप्रतिक्षीत महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार? सुप्रिम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष

महापालिकेच्या निवडणुका या पुढील महिन्यातच होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार, यासंबधी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

राज्यातील बहुप्रतिक्षीत महापालिका निवडणुकांचं भवितव्य आज ठरणार? सुप्रिम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष
सुप्रीम कोर्टImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 8:53 AM

मुंबई : पुढे ढकललेल्या महापालिका निवडणुकांचा (Municipality Elections) प्रश्न आज निकाली निघण्याची शक्यता वर्तवली जातेय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महापालिका निवडणूक प्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी आज होणार आहे. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड यांना मिळून एकूण 20 पेक्षा अधिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे आज स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. महापालिकांच्या निवडणुका आज होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार, याबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचीच नजर लागली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यामुळे निवडणुका लांबल्या होत्या. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली. त्यानंतर वॉर्डची रचना करण्याचा अधिकारही सरकारकडे देणण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने झालेल्या या निर्णयानंतर आता पालिका निवडणुकांबाबत आज मोठी बातमी काय येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

आज महत्त्वाचा निकाल

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, असा निर्णय सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही मिळून घेतला. त्यानंतर सरकारकडे प्रभागरनचनेचे अधिकार देण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याच आलेल्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, यासाठी अनेक पालिकांवर पुन्हा एकदा प्रशासक नेमण्याची वेळ आली. सध्या अनेक पालिकांचा कारभार हा प्रशासकांच्या मार्फतच चालवला जातोय.

एकूण 13 याचिका या निर्णयाला विरोध करणाऱ्या होत्या. त्या सगळ्यांवर आज सुनावणी होईल. सुप्रीम कोर्टानं या याचिकांच्या अनुशंगानं राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी सरकारनं सुप्रीम कोर्टाकडून वेळ मागून घेतली होती.

त्यानुसार सुप्रीम कोर्टानं 25 एप्रिल म्हणजे आजपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातल्या याचिकेवर काय सुनावणी होते, हे पाहणं महत्त्वाचंय. आज येणाऱ्या निकालात महापालिकेच्या निवडणुका या पुढील महिन्यातच होणार की दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार, यासंबधी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur election : नागपूर मनपा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

Nashik Municipal Election : महापालिका प्रभागरचनेची फाइल आयुक्तांकडे; निवडणूक विभाग म्हणतो, काय करायचे सांगा!

NMC Election | निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसारच प्रभाग रचना, नागपूर मनपा प्रशासन लागले कामाला

पाहा मोठी बातमी : मुंबईत भाजपनं लावले यशवंत जाधव यांच्या घोटाळ्याच्या पोलखोलीचे बॅनर

Non Stop LIVE Update
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल.
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक.
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट.
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?.
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा.
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप.
शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक
शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक.