AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री, थोडी कमी पीत चला, सुषमा अंधारे यांचा जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल!

आता जयकुमार गोरे यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय.

जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री, थोडी कमी पीत चला, सुषमा अंधारे यांचा जयकुमार गोरे यांच्यावर हल्लाबोल!
jaykumar gore and sushama andhareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 8:28 PM
Share

Sushama Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजपाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर वाद सुरू झाला. सुषमा अंधारे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर जयकुमार गोरे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले होते. हे आरोप करताना गोरे यांनी अंधारे यांचा उल्लेख ‘ज्येष्ठ भगिनी’ असा केला होता. दरम्यान, आता जयकुमार गोरे यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय.

पत्रकार परिषद घेत असताना थोडी कमी पीत चला

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जयकुमार गोरे यांना घेरलंय. ‘जयकुमार, पत्रकार परिषद घेत असताना थोडी कमी पीत चला… आणि हो एखाद्याच्या पत्रकार परिषदेचे उत्तर द्यायचं असेल तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत चला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच तुमच्यासाठी लिंगपिसाट शब्द संपूर्ण पत्रकार परिषदेत कुठेही वापरलेला नाही. पण तुम्हाला स्वतःला जर त्याबद्दल इतकी खात्री वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे, अशी खंतरी त्यांनी बोलून दाखवली.

शेवटी एकच छोटासा प्रश्न, काल…

तुमच्या आजूबाजूला बसलेले तुमचे जे दोन चमचे वजा दलाल आहेत ना कदाचित त्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे. आता तुमच्या दुसऱ्या वाक्याकडे येऊ, तुमच्या बोलण्याचं मला फार विशेष असं वाटलं नाही. भाजपचा मंत्री म्हटल्यावर ही भाषा फारच सहज स्वाभाविक आहे. कारण तुमच्यासारख्या माणसाकडून दुसरी काहीच अपेक्षा असू शकत नाही, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला. शेवटी एकच छोटासा प्रश्न, काल तुम्ही माझा उल्लेख ज्येष्ठ भगिनी असा केलात आणि आज तुमच्या तोंडी असे शब्द आहेत. जयकुमार तुमच्याकडे मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलतात का? असा बोचरा सवालही त्यांनी केलाय. आता अंधारे यांच्या या टीकेला जयकुमार गोरे काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us