AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, राजकीय पक्षांची लगबग

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, राजकीय पक्षांची लगबग
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 12, 2020 | 3:22 PM
Share

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा (Teacher and Graduate Constituency Election 2020) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप (BJP), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), मनसे (MNS), वंचित आणि बंडखोरांची लगबग सुरु झाली आहे. आज अनेक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्या-त्या पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, राष्ट्रवादी, भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे (Teacher and Graduate Constituency Election 2020).

पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप) vs अरुण लाड (राष्ट्रवादी) vs प्रताप माने (राष्ट्रवादी बंडखोर) vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs शरद पाटील (जनता दल) vs सोमनाथ साळुंखे (वंचित) vs श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)

नागपुरातून रिंगणात कोण?

अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) vs राहुल वानखेडे (वंचित) vs नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) vs सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) vs जयसिंगराव गायकवाड (भाजप) vs ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)

अमरावती शिक्षक पदवीधर मतदारसंघ

श्रीकांत देशपांडे (शिवसेना) vs नितीन धांडे vs दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) vs संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) vs प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

पुणे शिक्षक संघ

जयंत आसगावकर (काँग्रेस) vs उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ) (Teacher and Graduate Constituency Election 2020)

एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

संबंधित बातम्या :

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट

Teacher and Graduate Constituency Election 2020

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?