AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यात बदल

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत.

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यात बदल
| Updated on: Dec 14, 2019 | 2:03 PM
Share

मुंबई : ठाकरे सरकारचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल (Thackeray Government Ministry Changes) करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित केल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आता खातेबदल झाला आहे.

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जयंत पाटलांच्या काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. अर्थात अदलाबदल झालेली खाती दोघांकडे कायमस्वरुपी राहणार की तात्पुरती, हे अद्याप अस्पष्ट आहे. तसंच या बदलांमागील कारणही समजू शकलेलं नाही.

बदलानंतर कोणाकडे कोणती खाती? (Thackeray Government Ministry Changes)

छगन भुजबळ (07)

ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण

जयंत पाटील (07)

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

एकनाथ शिंदे (10) गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई (12) उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये आणि राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

बाळासाहेब थोरात (05) महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम).

नितीन राऊत (06)

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार (Thackeray Government Ministry Changes) होण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.