AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री-पंतप्रधानांच्या भेटीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी, भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक, फडणवीस नेमकं काय म्हणाले?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला भाजपचे राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री-पंतप्रधानांच्या भेटीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी, भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक, फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 2:41 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्येही बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर आता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला भाजपचे राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असताना आम्हालाही सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis’s reaction to the meeting between CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi)

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर ती चांगली गोष्ट आहे. राज्याने जर केंद्राशी समन्वय ठेवला तर राज्याचा फायदा होतो. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं हे चांगलं नाही. आज ते पंतप्रधानांना भेटले ही चांगली गोष्ट आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतली की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी जेव्हा डेलिगेशन घेऊन जायचो तेव्हा 5 ते 10 मिनिटे ते डेलिगेशनशी चर्चा करतात आणि मग मुख्यमंत्र्यांशी 5 ते 10 मिनिटे वेगळी चर्चा करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांची वेगळी भेट झाली असेल तर त्याच आश्चर्य वाटण्यासारखं काही नसल्याचं फडणवीस म्हणाले.

‘समन्वय साधला तर राज्याचा फायदा’

अशा प्रकारच्या बैठकीतून केंद्र आणि राज्यात समन्वय साधला जातो. निवडणूक काळात राजकारण होत असतं पण इतर वेळी समन्वय साधला तर राज्याचा फायदा होतो. महाराष्ट्र नेहमीच केंद्र सरकारच्या अजेंड्यावर राहिलाय. जे काही भूमिका आहे ती योग्य ठेवली तर त्याच राज्याचा फायदा होत असतो, असंही फडणवीस म्हणाले.

‘आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता’

त्याचबरोबर आम्हाला सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता. मात्र, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रि-मॅच्यूअर आहे. कारण, न्यायमूर्ती भोसले यांच्या समितीचा अहवाल पाहिला असेल तर त्या समितीने मराठा आरक्षणा पुन्हा मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे हे या अहवालात सांगण्यात आलंय. त्या अहवालात राज्याने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करुन पुढची कार्यवाही करावी लागेल असं सांगितलं आहे. पण ति करण्यात आलेली नाही. पण ठीक आहे, भेट घेतली आहेत तर त्याचा फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या :

‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली?, वाचा महत्त्वाचे आणि मोठे 10 मुद्दे

Devendra Fadnavis’s reaction to the meeting between CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.