AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ‘ठाकरे मुक्त’ शिवसेनेकडे वाटचाल? एकनाथ शिंदेंची एक एक स्टेप समजून घ्या !

एकनाथ शिंदे आता शिवसेनेसोबतच धनुष्य बाण चिन्हावर दावा करू शकतात. राष्ट्रीय निवडणूक आयोग पक्षांना मान्यता देते. दोन गटात पक्षाच्या चिन्हावरून वाद झाल्यास निवडणूक आयोग निर्णय देते. तो निर्णय मान्य नसल्यास न्यायालयात जाता येते.

Eknath Shinde: 'ठाकरे मुक्त' शिवसेनेकडे वाटचाल? एकनाथ शिंदेंची एक एक स्टेप समजून घ्या !
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
| Updated on: Jun 24, 2022 | 4:48 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला आणि पक्षाला धोका निर्माण झालाय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 42 आमदारांचं समर्थन मिळविलं. आता पुढचं पाऊल हे शिवसेनेला आपल्या हातात घेण्याचं आहे. ठाकरे मुक्त शिवसेना करण्याकडं एकनाथ शिंदे यांची वाचचाल सुरू आहे. सुरुवातीला त्यांनी पक्षाचे दोन-तृतांश आमदार माझ्यासोबत असल्याचं पत्र राज्यपालांना पाठविलं आहे. आता आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुवाहाटी (Guwahati) येथे असलेल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून निवडले आहे. या आमदारांच्या सह्यांचं पत्र विधानसभेचे (Assembly) उपाध्यक्ष आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पाठविण्यात आलंय. त्यात त्यांनी आमचा पक्ष हा शिवसेना असल्याचं म्हटलंय. त्यामुळं शिवसेना हा पक्ष ताब्यात घेण्यासाठी पक्षाचं चिन्ह व झेंड्यावरून घमासान सुरू आहे.

शिवसेनेचे 37 आमदार सोबत असल्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन तृतांश आमदार असल्यानं त्यांच्यावर पक्ष बदलल्याचा आरोप लावता येणार नाही. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. माझ्यासोबत 37 शिवसेनेचे आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळं पक्षांतरबदलाची कारवाई त्यांच्यावर होणार नाही. दोन तृतांशपेक्षा कमी आमदारांनी बंडखोरी केल्यास त्यांना बंडखोर म्हणता येते. 37 आमदार शिंदे यांच्यासोबत असतील तर 17 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्याकडं राहतील.

ठाकरे, शिंदे गटात पक्षाच्या चिन्हावरून वाद

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली. एकनाथ शिंदे आता शिवसेनेसोबतच धनुष्य बाण चिन्हावर दावा करू शकतात. राष्ट्रीय निवडणूक आयोग पक्षांना मान्यता देते. दोन गटात पक्षाच्या चिन्हावरून वाद झाल्यास निवडणूक आयोग निर्णय देते. तो निर्णय मान्य नसल्यास न्यायालयात जाता येते. आता हे प्रकरण कुठपर्यंत जाते ते पाहावं लागेल. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आमदार आपल्या खेम्यात आणण्यात यशस्वी झाले. आता त्यांना कायदेशीर बाजू सांभाळावी लागणार आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.