ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही : विनोद तावडे

एका झेंड्याचा दांडा पकडायला माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार असा सवाल भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना केला.

ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही : विनोद तावडे
Follow us
| Updated on: Aug 24, 2019 | 5:43 PM

मुंबई : एका झेंड्याचा दांडा पकडायला माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार असा सवाल भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना केला. ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही, असा घणाघात विनोद तावडेंनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सभांमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) छायाचित्र असलेला भगवा झेंडाही (Saffron Flag) फडकणार आहे. घड्याळ चिन्हाच्या झेंड्यासोबत भगवाही फडकवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली.

त्याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं.

तावडे म्हणाले, “अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचा दंडा पकडायला माणसं नाहीत. तो झेंडा कोण घेणार खांद्यावर? तुमचे पक्षाचे मंडळी सोडून चालली आहेत, मग झेंडा झेंडा काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर शिवाजी महाराजांनी जे शिकवलं आहे ते अंमलात आणणार आहोत का? रयतेला न लुटता रयतेला घडवणं हे महाराजांनी केलं. आपल्या काळात किती घोटाळे झाले, आपण रयतेच आपण काय केलं हे विसरू नका. झेंडा मानाने, प्रेमाने, खंबीरपणे त्याचा दंडा पकडणारा कार्यकर्ता हा उभा राहिला पाहिजे. जो तुमच्या सगळ्या नेत्यांना बघून पळत सुटला आहे आणि नेतेही पळत सुटले आहेत”.

भगवा परंपरेचं प्रतिक

“भगवा झेंडा हा हिंदुत्वा मुद्दाच नाही. भगवा झेंडा हा आपल्या परंपरेचं प्रतिक आहे. मंदिरात भगवा झेंडा असतो. वारीला जातो त्या वारकऱ्याकडे भगवा झेंडा असतो. भगवा झेंडा हा मुळात त्यागाचं प्रतिक आहे. आपले सगळे गुरु, महाराज हे सगळे भगवे असतात, कारण ते त्यागाचं प्रतिक आहे. त्यागाचे प्रतिक घेऊन जे राज्य करतात ते त्याग करतात. त्यामुळे स्वार्थ करणारे ज्यांच्यावर राज्य सरकारी बँकेतील घोटाळ्यामुळे गुन्हे दाखल करा म्हटले आहे, त्यांना भगव्या झेंड्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही”, असा घणाघात तावडेंनी अजित पवारांवर केला.

संबंधित बातम्या 

पवारांच्या हाती भगवा, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भगवा फडकवण्याचे आदेश 

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.