राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली

सोनिया गांधी आणि शरद पवार यांची उद्या होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सोमवारी ही बैठक होणार (Sharad pawar meet sonia gandhi) आहे. 

राष्ट्रवादीची पुण्यात बैठक, शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट पुढे ढकलली

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर दिसत आहे. राज्यात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (Sharad pawar meet sonia gandhi) झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सलग तीन दिवस बैठका होणार असल्याचे बोललं जात (Sharad pawar meet sonia gandhi) होतं. मात्र सोनिया गांधी आणि शरद पवार यांची उद्या होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सोमवारी (18 नोव्हेंबर) ही बैठक होणार (Sharad pawar meet sonia gandhi) आहे.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. येत्या 17,18, 19 नोव्हेंबरला या बैठका होणार होती. मात्र उद्या म्हणजे 17 नोव्हेंबरला होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी 18 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधींची बैठक होणार होत्या. या बैठकीत महासेना आघाडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे उद्या (17 नोव्हेंबर) पुण्यात संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत ही बैठक होणार आहे. शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शरद पवार दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे बोललं जात आहे.

दिल्लीतील या बैठकीसाठी शरद पवार 17 नोव्हेंबरला सकाळी रवाना होणार होते. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सोनिया गांधी आणि शरद पवार यांची चाय पे चर्चा होणार होती. त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे 18 आणि 19 नोव्हेंबरला मॅरेथॉन बैठका (Sharad pawar meet sonia gandhi) होणार होत्या.

या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या : 

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची तारीख ठरली, महासेनाआघाडीच्या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा ?

सरकार येणार तर भाजपचंच : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्रिपदाची मागणी असेल, तर विचार करु : शरद पवार

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI