शिंदे गटाने नवीन पक्ष काढावा किंवा दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं; शिवसेनेच्या वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद

आमदारांनी गुवाहाटीला जाऊन पक्ष सोडला. पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केले. त्यामुळं ते आमदार अपात्र होतात.

शिंदे गटाने नवीन पक्ष काढावा किंवा दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं; शिवसेनेच्या वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
वनिता कांबळे

|

Sep 27, 2022 | 4:40 PM

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या वाद चांगलाच पेटला आहे. आम्ही खरी शिवसेना आहोत असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात केला. यानंतर शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी शिंदे गटाचा युक्तीवाद खोडून काढला आहे.

या आमदारांच पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे हे मुळ पक्षावर दावा करू शकत नाहीत. हे शिवसेनेवर दावा करू शकत नाहीत. यांनी नवीन पक्ष काढावा किंवा दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं असा युक्तीवाद वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंनी स्वतः स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडलं. शिंदे अपात्र असताना त्यांना पक्षाचं सदस्य मानले जातं आहे. निवडणूक आयोग असं कसं करु शकतो असं म्हणत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे.

आमदारांनी गुवाहाटीला जाऊन पक्ष सोडला. पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केले. त्यामुळं ते आमदार अपात्र होतात, पण निवडणूक आयोगाने हे पहावं की 19 जुलै पूर्वी पक्षाच स्टेटस काय होत. त्यापूर्वी शिंदे गटातील आमदारांनी स्वतः हुन पक्ष सोडला.

शिंदे यांची पक्षात नेमणूक केली. शिंदे पक्षातंर्गत निवडून आले नाहीत यामुळे त्यांना पक्षावरती दावा सांगता येणार नाही अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली.

निवडणूक आयोग म्हणतो शिवसेना पक्षात 2 गट आहेत. पण शिंदे कुठल्या आधारावर पक्षात आहेत असं निवडणूक आयोगाला वाटतं ? असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें