Chandrasekhar Bawankule : हे तर अडीच वर्षांतील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, यांनी केवळ वेळकाढूपणा केला, भाजप प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल..

Chandrasekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे..

Chandrasekhar Bawankule : हे तर अडीच वर्षांतील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, यांनी केवळ वेळकाढूपणा केला, भाजप प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल..
ठाकरेंवर हल्लाबोलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 11:02 PM

सिंधुदुर्ग : बुलढाण्यातून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी आज पुन्हा रणशिंग फुंकले. राज्य सरकारवर सर्वच बाजूने त्यांनी बॉम्बगोळे फेकले. त्यामुळे विरोधाला पुन्हा धार चढली आहे. ठाकरेंच्या सभेनंतर त्यावर भाजप (BJP) आणि शिंदे गटातून (Shinde Group) प्रतिवाद करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. ठाकरे यांनी सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवल्याने बावनकुळे यांनी जोरदार प्रहार केला. त्यांनी ठाकरे यांच्या सरकारच्या कारकिर्दीवर तिखट वाकबाण सोडले.

सिधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ठाकरे सरकारच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. ठाकरे सरकार अडीच वर्षातील सर्वात निष्क्रिय सरकार होते, त्यांनी केवळ वेळकाढूपणा केला असा आरोप त्यांनी केला.

ठाकरे यांचे सरकार सोशल मीडिया आणि रिमोट अॅक्सेसद्वारे सुरु असल्याचे तोंडसूख बावनकुळे यांनी घेतले. जनतेशी बोलताना फेसबूक लाईव्ह तर कॅबिनेटच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ते हजर होते, त्यांच्या खासगी सचिवाला भेटायला चार चार दिवस वेळ देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ठाकरे यांनी 18 महिने आमदारांची भेट घेतले नाही. त्यांच्या पत्रांवर स्वाक्षरी केली नाही. त्यांच्यात काहीच ताकद नव्हती. जी ताकद आहे ती पंतप्रधान मोदी यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

आजच्या सभेत ठाकरे यांनी केलेली टीका, वापरलेल्या भाषेवरीही बावनकुळे यांना जोरदार प्रहार केला. जे आमदार, मंत्री, सहकारी निघून गेले, त्यांना रेडे म्हटल्या जात आहे. ठाकरे यांनी अशीच टीका केली तर पुढील निवडणुकीत त्यांचे दोन आमदारही निवडून येणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.