Supreme court : …म्हणून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आजऐवजी उद्या होणार! महत्त्वाचं कारण समोर

Supreme court on Eknath shinde vs shiv sena Live : न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, सी. टी रविकुमार, हिमा कोहली या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होते आहे. यापैकी सी टी रविकुमार आज उपलब्ध नसल्याची नोटीस आली आहे. सी टी रविकुमार गैरहजर असल्यामुळे आजची सुनावणी उद्यावर गेली असल्याचं सांगितलं जातंय.

Supreme court : ...म्हणून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आजऐवजी उद्या होणार! महत्त्वाचं कारण समोर
सुप्रीम कोर्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 10:22 AM

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी पार पडणार होती. या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मात्र गही सुनावणी आजऐवजी उद्या होणार आहे. असं होण्यामागचं कारणही आता समोर आलंय. सुप्रीम कोर्टात सुनावणी (Eknath Shinde vs Shiv sena Hearing) तीन जणांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, सी. टी रविकुमार, हिमा कोहली या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होते आहे. यापैकी सी टी रविकुमार आज उपलब्ध नसल्याची नोटीस आली आहे. सी टी रविकुमार गैरहजर असल्यामुळे आजची सुनावणी उद्यावर गेली असल्याचं सांगितलं जातंय. तीन जणांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणं अपेक्षित असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.

पाच याचिकांवर सुनावणी

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष आता न्यायालयीन लढ्यापर्यंत पोहोचला आहे. खरी शिवसेना कुणाची? राज्यपालांची भूमिका, विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर 12 आमदारांच्या निलंबनाचा विषय, विधानसभा उपाध्यक्षांबाबत बंडखोर आमदारांनी आणलेला प्रस्ताव, अशा एकमेकांशी संबंधित असणाऱ्या गुंतागुंतीच्या राजकीय पेचावर सुप्रीम कोर्टात नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या रुपात पाहिलंय. त्यानंतर विस्कळीत झालेली शिवसेनेची घडी बसवण्याचं आव्हानही उद्धव ठाकरेंसमोत आहे. शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, यावरुनही चढाओढ पाहायला मिळतेय. त्यासाठीही कागदोपत्री लढा सुरु असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. या सगळ्या अनुशंगाने करण्यात आलेल्या एकूण पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात एका विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, सुनावणी जरी पुढे ढकलली गेली असली, तरी अनिल परब आणि सुभाष देसाई हे राजधानी दिल्लीत दाखल झाले आहे. सुप्रीम कोर्टातही त्यांनी सकाळी हजेरी लावली. यावेळी कोर्टात जाताना अनिल परब यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्नही टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींनी केला. मात्र अनिल परब यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.