खासदारांचं रिपोर्ट कार्ड : देशातील टॉप 5 मध्ये महाराष्ट्रातील तीन खासदार!

लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे देशातील टॉप फाईव्ह खासदारांमध्ये पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.Maharashtra MP in top five list

खासदारांचं रिपोर्ट कार्ड : देशातील टॉप 5 मध्ये महाराष्ट्रातील तीन खासदार!
Parliament winter session
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 11:45 AM

पुणे : लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे देशातील टॉप फाईव्ह खासदारांमध्ये पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत तर, त्यांच्या पाठोपाठ धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे, शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, मध्य प्रदेशचे सुधीर गुप्ता आणि जमशेदपूरचे बिद्युत महतो यांचा समावेश आहे. पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. (Maharashtra MP in top five list )

महाराष्ट्रातील पाच खासदार

लोकसभेच्या कामकाजात उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि सादर केलेली विधेयकं खासदारांच्या कामगिरीसाठी महत्वाची समजली जातात. याच निकषावर महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, सुभाष भामरे, डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे.

गोपाळ शेट्टी अव्वल

सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत. महाराष्ट्रातील टॉप फाईव्हमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, भाजपचा एक आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे. विधेयकांच्याबाबतीत भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

लोकसभेच्या संसदीय कामकाजात महाराष्ट्र अव्वल आहे. तर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे हे तसे नवे खासदार असूनही त्यांची कामगिरी चमकदार आहे.

(Maharashtra MP in top five list )

संबंधित बातम्या 

राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर   

शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.