राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर

अशोक गहलोत यांच्या मागणीला पक्षातून काही नेत्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी मौन बाळगले आहे. (Rahul Gandhi Congress Chief again Ashok Gehlot pitches idea at CWC meeting)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:04 AM, 24 Jun 2020
राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्यावी, या मागणीला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत जोर आला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा विषय काढल्याचे बोलले जाते. (Rahul Gandhi Congress Chief again Ashok Gehlot pitches idea at CWC meeting)

काँग्रेस कार्यकारिणीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) वर्चुअल बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

गहलोत यांच्या मागणीला पक्षातून काही नेत्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी मौन बाळगले आहे.

हेही वाचा : चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात, मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी केवळ भारत-चीन तणाव, कोरोना संकट, अर्थव्यवस्थेची स्थिती, इंधनाचे वाढते दर यावर चर्चा झाली, राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याचा विषयच निघाला नाही, तुम्हाला ही बातमी कुठून मिळाली? असा प्रतिप्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा

2017 मध्ये राहुल गांधींची कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधींनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी पक्षप्रमुख म्हणून त्यांची जागा घेतली. परंतु गेल्या वर्षभरापासून राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पुन्हा जबाबदारी देण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. (Rahul Gandhi Congress Chief again Ashok Gehlot pitches idea at CWC meeting)

(Rahul Gandhi Congress Chief again Ashok Gehlot pitches idea at CWC meeting)