चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात, मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला

जे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीत ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे" असंही मनमोहन सिंह यांनी लिहिलं आहे. (Ex PM Manmohan Singh writes letter to Modi Government over China Face Off)

चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात, मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला

नवी दिल्ली : मोदी सरकारने चीनला चोख प्रत्युत्तर द्यावे, अन्यथा तो जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल, असा सल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला आहे. पूर्ण राष्ट्राने एकजूट दाखवत चीनच्या आगळीकीला उत्तर देण्याची वेळ आली आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, अशा भावना व्यक्त करत मनमोहन सिंह यांनी लडाखच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. (Ex PM Manmohan Singh writes letter to Modi Government over China Face Off)

’15 -16 जूनला गलवानच्या खोऱ्यात भारताच्या 20 साहसी जवानांची प्राणांची आहुती दिली. देशातील या सुपुत्रांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाचे रक्षण केले. या सर्वोच्च त्यागासाठी आम्ही साहसी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कृतज्ञ आहोत, परंतु आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये’ असं डॉ. मनमोहन सिंह म्हणतात.

“आज आपण इतिहासाच्या नाजूक वळणावर आहोत. भावी पिढ्या आमचे मूल्यांकन कसे करतील, हे आपल्या सरकारचे निर्णय आणि पावलांवर अवलंबून आहे. जे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीत ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे” असंही मनमोहन सिंह यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदी खरं तर ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा

‘पंतप्रधानांनी आपले शब्द आणि घोषणा करताना देशाची सुरक्षा आणि जागतिक हितसंबंधांवर होणाऱ्या परिणामांविषयी नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे. एप्रिलपासून चीनने अनेक वेळा गलवान व्हॅली आणि पॅनगाँग त्सो लेक भागात घुसखोरी केली आहे.’ असा दावाही मनमोहन सिंह यांनी केला.

‘भ्रामक प्रचार कधीच कूटनीती किंवा मजबूत नेतृत्वाला पर्याय ठरु शकत नाहीत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडे आम्ही आग्रह करतो, की त्यांनी वेळेच्या कसोटीचा सामना करावा आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा’ तसेच ‘भूभागीय अखंडते’साठी प्राणांची आहुती देणाऱ्या कर्नल बी. संतोष बाबू आणि जवानांच्या बलिदानाच्या कसोटीला सामोरे जावे. यापेक्षा कमी काहीही केल्यास तो जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल” असा इशारा मनमोहन सिंह यांनी दिला आहे.

मनमोहन सिंहांचा मोदींना सल्ला, शब्द वापरताना सावधान!

1. शहिदांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये 2. सध्या आपण इतिहासाच्या नाजूक वळणावर 3. सरकारच्या निर्णयांवर भावी पिढी आपलं आकलन करेल 4. देशाचं संरक्षण आणि हितावर पडणारा प्रभावाबद्दल पंतप्रधानांनी शब्द वापरताना, घोषणा करताना सावधान राहिलं पाहिजे 5. चीनने एप्रिल २०२०पासून आजवर अनेकदा गलवान खोरे, पांगोंग त्सो सरोवराच्या परिसरात घुसखोरी केली 6. चीनचा दबाव आणि धमक्यांपुढे आपण झुकायचंच नाही 7. भारताच्या अखंडतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारणारच नाही 8. मजबूत नेतृत्व आणि कुटनीतीला भ्रामक प्रचार हा पर्याय असूच शकत नाही 9. लांगूलचालन करणाऱ्या सहकाऱ्यांनी पसरवलेल्या असत्याच्या भ्रमजालात सत्य दडवलं जावू शकत नाही 10. पंतप्रधान आणि केंद्रसरकारला काळाचं आव्हान स्वीकारण्याचा आग्रह करत आहोत 11. शहिदांच्या बलिदानाच्या कसोटीवर उतरण्यापेक्षा काहीही कमी करणं जनादेशाशी ऐतिहासिक विश्वासघात असेल

संबंधित बातमी :

मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतावर आर्थिक मंदीचं संकट : मनमोहन सिंग

(Ex PM Manmohan Singh writes letter to Modi Government over China Face Off)

Published On - 11:40 am, Mon, 22 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI