मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतावर आर्थिक मंदीचं संकट : मनमोहन सिंग

भारताचा आर्थिक विकास दर (GDP) घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला.

मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतावर आर्थिक मंदीचं संकट : मनमोहन सिंग

मुंबई : भारताचा आर्थिक विकास दर (GDP) घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला. गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजेच एप्रिल ते जूनमध्ये जीडीपी दर हा 5 टक्के आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून सरकारच्या बेजबाबदारीपणामुळे निर्माण झाली आहे (Recession), असा आरोप मनमोहन सिंग यांनी केला.

2019-20 आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून महिन्यात जीडीपी 5 टक्के होता. त्यामुळे देशात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. भारताकडे अधिक वेगाने विकास करण्याची क्षमता आहे, पण मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे परिस्थिती बिघडली आहे. विशेष म्हणजे उत्पादन क्षेत्रातील वृद्धी दर हा 0.6 टक्के आहे. त्यामुळे जीएसटी आणि नोटबंदीमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे हे स्पष्ट होतं, असेही ते म्हणाले.

गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी घसरण झाली आहे. याचा फटका देशातील व्यापारी आणि नोकरदार वर्गावर दिसून येत आहे. गुंतवणूकदारांमध्ये साशंकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आर्थिक मंदीमुले अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एकट्या ऑटोमोबाईल क्षेत्रात साडेतीन लाख नोकऱ्या गेल्या आहेत. कंपन्यांनाही आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. यातून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे, असंही मनमोहन सिंग यांनी सांगितले.

ग्रामीण भागातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव मिळत नाही. उत्पन्नात घट झाली आहे. महागाई वाढली आहे. भारत अशा परिस्थितीत अधिक काळ चालू शकत नाही. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करु, असे आवाहनही मनमोहन सिंग यांनी केले.

व्हिडीओ :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *