AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना, तृणमूल नेत्याची जीभ घसरली

काळी नागिण चावल्यामुळे ज्याप्रकारे लोकांचा मृत्यू होतो, त्याचप्रकारे निर्मला सीतारमण यांच्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, अशी बोचरी टीका तृणमूल नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली.

निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना, तृणमूल नेत्याची जीभ घसरली
| Updated on: Jul 05, 2020 | 3:48 PM
Share

कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी थेट काळ्या नागिणीशी केली. (TMC Leader Kalyan Banerjee compares Nirmala Sitharaman with Black Cobra)

“काळी नागिण (विषारी साप) चावल्यामुळे ज्याप्रकारे लोकांचा मृत्यू होतो, त्याच प्रकारे निर्मला सीतारमण यांच्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि सीतारमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्या इतिहासातील सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत” अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली.

कल्याण बॅनर्जी कोण आहेत?

कल्याण बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेरामपूर मतदारसंघातून खासदारकी मिळवली आहे. ते एक सुप्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी तृणमूलसाठी असंख्य केसेस लढल्या आहेत

तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “जूनमध्ये राज्यात बेरोजगारीचा दर 6.5 टक्के होता, जो देशाच्या तुलनेत ‘बराच चांगला’ आहे” केंद्राद्वारे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा हवाला त्यांनी दिला होता. कोविड-19 संकट आणि अम्फान चक्रीवादळ यांचा सामना करण्यासाठी आपल्या सरकारने आखलेल्या आर्थिक रणनीतीमुळे हे साध्य झाल्याचा दावा त्यांनी केला होता. (TMC Leader Kalyan Banerjee compares Nirmala Sitharaman with Black Cobra)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.