राजस्थान विधानसभा निवडणुकीतील टॉप-5 लढती

राजस्थान विधानसभा निवडणुकीतील टॉप-5 लढती

जयपूर : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल मतपेटीत बंद आहे. उद्या म्हणजे 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि राजस्थानात सत्ता कुणाची असेल, हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलनुसार सत्तांतराची शक्यता आहे. वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार सत्तेतून जाण्याची शक्यता अनेक सर्वेक्षणांनी वर्तवली आहे. दरम्यान, राजस्थानात कोणत्या लढतींकडे राजस्थानसह देशाचं लक्ष लागलं आहे, ते पाहूया :

  1. झालरापाटन मतदारसंघ – मुख्यमंत्री वसुंधरा राजे विरुद्ध मनवेंद्र सिंग

वसंधरा राजे राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत. झालरापाटनमधून त्या सलग तीनवेळा जिंकल्या आहेत. तर मनवेंद्र सिंग हे भाजपचे वरिष्ठ नेते जसवंत सिंग यांचे पुत्र आहेत. मनवेंद्र यांनी सप्टेंबर महिन्यातच भापला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.

  1. सरदारपुरा मतदारसंघ – अशोक गहलोत विरुद्ध शंभुसिंग खेतासर

अशोक गहलोत हे राजस्थानमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. राजस्थानचं मुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवलं आहे. सलग चारवेळा गहलोत या जागेवरुन विजयी झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्रिपदाचेही ते प्रमुख दावेदार आहेत.

गहलोत यांच्या विरोधात लढणारे खेतासर हे 2008 साली बसपाच्या तिकिटावर विधानसभा आणि लोकसभा लढवली होती. मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले होते. 2014 साली मोदी लाटेत जोधपूरमधील विधानसभेच्या दहाही जागा काँग्रेस पराभूत झाली होती. मात्र, गहलोत या लाटेतही विजयी झाले होते.

  1. टोंक मतदारसंघ – सचिन पायलट विरुद्ध युनूस खान

सचिन पायलट हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपने या मतदारसंघातून पहिल्यांदाच मुस्लीम उमेदवार दिला आहे. युनूस खान हे वसुंधरा राजेच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत हिंदू विरुद्ध मुस्लीम असाच संघर्ष राहिला आहे. मात्र, यावेळी जातीआधारित प्रचार केला गेला. पायलट यांना या मतदारसंघातील गुर्जर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. मुस्लीम, गुर्जर आणि एससी-एसटी असा समाज पायलट यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता असून, पायलट यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

  1. उदयपूर – गुलाबचंद कटारिया विरुद्ध गिरीजा व्यास

गुलाबचंद कटारिया हे वसुंधरा राजेंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेत, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या गिरीजा व्यास या काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे या जागेवर दोन मंत्र्यांमध्ये टक्कर असणार आहे.

  1. डीग कुम्हेर – विश्वेंद्र सिंह विरुद्घ शैलेश सिंह

विश्वेंद्र सिंह हे राजस्थानातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यासमोर भाजपचेने दिगंबर सिंह यांच्या मुलाला म्हणजेच शैलेश शिंह यांना उतरवलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI