'मुंबई लोकलवर आंदोलन करुन राजकारण करु नका', अनिल परब यांची मनसेवर टीका

ज्याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेच्या आज (21 सप्टेंबर) झालेल्या सविनय कायदेभंग आदोलनावर केली (Anil Parab On MNS Protest).

'मुंबई लोकलवर आंदोलन करुन राजकारण करु नका', अनिल परब यांची मनसेवर टीका

मुंबई : ज्याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेच्या आज (21 सप्टेंबर) झालेल्या सविनय कायदेभंग आदोलनावर केली (Anil Parab On MNS Protest). आज मुंबईतील अनेक ठिकाणी मनसेकडून लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सविनय कायदेभंग आंदोलaन करण्यात आले. या आंदोलनावर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली (Anil Parab On MNS Protest).

ज्याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या. सर्व गोष्टींची काळजी करुन रेल्वे खुली करावी लागते. आधीच प्रादुर्भाव वाढतोय, रेल्वे खुली केली तर प्रादुर्भाव वाढेल. टप्प्या टप्प्याने आम्ही खुल्या करतोय, आता रेल्वेच्या फेर्‍या वाढवल्या आहेत, असं अनिल परब म्हणाले.

रेल्वेमध्ये गर्दी झाली तर प्रादुर्भाव होईल. टप्प्या टप्प्यात रेल्वे सुरु केली जात आहे. लोकांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. याचे राजकीय आंदोलन करू नये, राजकीय फायदा घेऊ नये. बस पेक्षा रेल्वेची प्रवासी संख्या जास्त आहे. रेल्वेची संख्या मर्यादित नाही. बसमधील गर्दी होत आहे यावर काही निर्बंध घेतले जाईल. लोकल सेवा कधी सुरू करायची याबतीत समीतीत निर्णय घेतला जाईल, असंही अनिल परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर अनिल परब यांची प्रतिक्रिया 

“एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. सहा महिने एसटी सेवा कोलमडली होती. एसटीचे उत्पन्न घटलेले आहे. पगार देणे हे माझे कर्तव्य आहे. कोरोनाच्या महामारीत आर्थिक ताणाताणी झाली. मी राज्य सरकारकडे पुन्हा पैसे मागितले आहेत, तसेच कर्जासाठीसुद्धा बँकाकडे अर्ज केला आहे. पगार लवकर करण्याचा प्रयत्न करत आहे”, असं अनिल परब म्हणाले.

“2200 कोटींची मागणी राज्य सरकारकडे मागितले आहेत. 500 कोटी मिळाले आहेत. भत्ता बाकी आहे. ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांचे 50 लाख देणे बाकी आहेत. एसटी आता पूर्णपणे सुरु झाली आहे. आता यातून मार्ग निघेल”, असंही अनिल परब म्हणाले.

संबंधित बातम्या :

मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?

MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *