कृषी कायद्यांविरोधात ममता बॅनर्जींचा एल्गार, तृणमूलतर्फे धरणे आंदोलन

मंगळवारपासून (8 डिसेंबर) गुरुवारपर्यंत ( 10 डिसेंबर) कोलकाता येथे आंदोलन करण्याचे आदेश ममता यांनी दिले आहेत. (Mamata Banerjee agricultural law)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:46 PM, 4 Dec 2020
RSS Hinduism Will Fight With Bjp

कोलकाता : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनीही या कायद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी मंगळवारपासून (8 डिसेंबर) गुरुवारपर्यंत ( 10 डिसेंबर) कोलकाता येथे आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (4 डिसेंबर) ममता बॅनर्जी यांनी कालीघाट येथील अपल्या निवासस्थानी पक्षाचे नेते, जिल्हाध्यक्ष, आणि ब्लॉक प्रमुखांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत ममतांनी हे आदेश दिले. (trinamool Congress chief Mamata Banerjee ordered to start the protest against agricultural law)

कोलकाता येथील मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला (Mayo Road Gandhi Statue) साक्षी ठेवून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मंत्री पुर्षेंदू बसू करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 10 डिसेंबरला खुद्द ममता बॅनर्जी या आंदोलनात सहभाग नोंदवतील. यावेळी त्या आंदोलक तसेच जनतेला संबोधित करतील. यावेळी कोल इंडिया (Coal India) या सरकारी कंपनीच्या खासगीकरणाविरोधातही कोल इंडियाच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली

पश्चिम बंगलामध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुका लक्षात घेऊन तृणमूलने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यांनी ‘द्वारे सरकार’ या योजनेनंतर आता ‘बंगध्वनी’ नावाचे जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. या अभियानाद्वारे तृणमूलचे कार्यकर्ते  डोअर-टू-डोअर जाऊन नागरिकांना सरकारच्या योजनांची माहिती देणार आहेत. तसेच विकासकामांचा लेखाजोखाही या योजनेद्वारे नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.

दगाफटका करणाऱ्यांविरोधात कठोर करावाई

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या विरोधात जाणाऱ्यांविरोधात कठोर करावाई करण्यात येईल, असे सांगितले. तसे आदेशही त्यांनी दिले आहेत. काथी, हल्दिया, पांशकुडा या भागातील काही नेते ममता तसेच पक्षाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. या सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश ममता यांनी खासदार शिशीर अधिकारी (MP Sisir Adhikari)  यांना दिले आहेत.

भाजपकडून कारवाईची भीती

यावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली. “भाजप हा लुटारु पक्ष आहे. भाजपकडून सरकारी संस्थांच्या माध्यमातून कारवाईची भीती दाखवली जात आहे. भाजपसोबत जे कोणी जात असतील त्यांनी जावं; पण आपल्याला त्यांचा सामना करावा लगेल,” असे ममता म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

‘कोरोना झाल्यास ममता बॅनर्जींना मिठी मारेन’, इशारा देणारा भाजप नेता कोरोना पॉझिटिव्ह

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी राष्ट्रपती शासन लागू करा, भाजपची मागणी

(trinamool Congress chief Mamata Banerjee ordered to start the protest against agricultural law)