AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्याच्या पत्नीची मानहानी भोवली, तृणमूलच्या खासदाराला 50 लाख दंड, असे आहे महाराष्ट्र कनेक्शन

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना मानहानीच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांना 50 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी हा आदेश दिला. यासोबतच न्यायालयाने दोन मोठ्या अटीही खासदार गोखले यांना घातल्या आहेत.

मंत्र्याच्या पत्नीची मानहानी भोवली, तृणमूलच्या खासदाराला 50 लाख दंड, असे आहे महाराष्ट्र कनेक्शन
saket gokhaleImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 01, 2024 | 5:38 PM
Share

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांना मानहानी प्रकरणी 50 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी याबाबतचा आदेश दिला आहे. न्यायालयाने 8 आठवड्यांच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत. खासदार साकेत गोखले यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे लक्ष्मी पुरी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी खासदार साकेत गोखले यांना लक्ष्मी पुरी यांना 50 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

हरदीप सिंग पुरी हे मोदी सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांच्यावर स्वित्झर्लंडमध्ये अघोषित संपत्तीसह मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ट्विटद्वारे केला होता. त्यामुळे लक्ष्मी पुरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात साकेत गोखले यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने 2021 मध्ये गोखले यांनी त्यांचे बदनामीकारक ट्विट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. याशिवाय गोखले यांनी पुरी कुटुंबावर असे आरोप करणारे ट्विट करू नयेत, असे आदेशही देण्यात आले होते.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी आज साकेत गोखले यांना लक्ष्मी पुरी यांची बदनामी केल्याप्रकरणी 50 लाख रुपये त्यांना देण्याचे आदेश दिले. 50 लाख रुपये भरण्यासोबतच साकेत गोखले यांना एका मोठ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले माफीनामा पत्रही द्यावे. तसेच, X हँडलवरही माफी मागावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

साकेत गोखले यांचे काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने साकेत गोखले यांना राज्यसभेवर संधी दिली. माहिती आधिकार कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या साकेत यांना तृणमुलने पक्षात कामाची संधी दिली. त्यांनी संधीचे सोने करत साकेत गोखले यांनी झोकून पक्षाचे काम केले. त्यामुळेच त्यांना तृणमृल काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले. साकेत हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

साकेत गोखले हे मूळचे नाशिकचे असून ते राजकारणात येण्यापूर्वी पत्रकारिता करीत होते. त्यांचे वडील सुहास गोखले हे नाशिकच्या पंचवटी भागातील कपालेश्वर मंदिरामागे खांदवे सभागृहाजवळ राहतात. मुंबईत विल्सन कॉलेज येथे साकेत यांचे शिक्षण झाले आहे. येथेच माहिती आधिकार कार्यकर्ते म्हणून ते नावारूपाला आले. राजकीय पत्रकारिता करत असताना नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी परिचय झाल्यानंतर त्यांनी काही काळ काँग्रेसचे काम केले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.