AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन […]

ममता बॅनर्जींचे 3 आमदार दिल्लीला रवाना, भाजप प्रवेशाची शक्यता
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 27, 2019 | 10:40 PM
Share

कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप आता टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभेतही धक्का देण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार टीएमसीचे तीन आमदार भाजपात दाखल होण्याची शक्यता आहे. हे तीन आमदार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.

2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी मोठी उडी घेत 18 जागांवर विजय मिळवला. टीएमसीचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्यादा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात केला होता. विशेष म्हणजे बंगालमधील भाजप आमदारानेही हाच दावा करत पुढच्या 90 दिवसांमध्ये ममतांचं सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं.

एकाच विमानाने टीएमसीचे तीन आमदार दिल्लीला रवाना झाल्याने टीएमसीच्या गोटात खळबळ आहे. भाजप नेते मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार सुभ्रांशू रॉय यांचाही या तीन आमदारांमध्ये समावेश आहे. सुभ्रांशू रॉय यांना काही दिवसांपूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आलंय. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका रॉय यांच्यावर ठेवण्यात आलाय.

एकेकाळचे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असणारे मुकुल रॉय यांनी लोकसभेच्या अगोदर भाजपात प्रवेश केला होता. वडिलांचं कौतुक केल्यामुळे सुभ्रांशू यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. बंगालमधील भाजपच्या दमदार कामगिरीचं श्रेय सुभ्रांशू यांनी वडिलांना दिलं होतं. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दाव्यानुसार, टीएमसीचे जवळपास 100 नेते भाजपच्या संपर्कात आहेत.

295 सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे 213 आमदार आहेत. सीपीआयएम 25, आरएसपी 03, एआयएफबी 02, सीपीआय 01, भाजप 06 आणि इतर 02 असं संख्याबळ आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही. पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, त्यानंतर भाजप आणि टीएमसी यांच्यात जुंपली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...