TV9 Marathi CICERO Maharashtra Exit poll | शिवसेना 74, राष्ट्रवादीला 35 जागांचा अंदाज

महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Exit poll 2019) आज अखेर मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (TV9 Marathi CICERO Exit poll) राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली.

TV9 Marathi CICERO Maharashtra Exit poll | शिवसेना 74, राष्ट्रवादीला 35 जागांचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Exit poll 2019) आज अखेर मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (TV9 Marathi CICERO Exit poll) राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाचा अंतिम टक्का अद्याप हाती आलेला नाही. थोड्यावेळात हा आकडा हाती येईल. मात्र जनतेचा कौल काय हे टीव्ही 9 आणि सिसेरोने एक्झिट पोल (TV9 Marathi CICERO Exit poll) अर्थात मतदानोत्तर (Maharashtra Exit poll 2019) चाचणीतून जाणून घेतलं आहे.

या एक्झिट पोलनुसार, राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टीव्ही 9 सिसेरोच्या एक्झिट पोलनुसार,  महायुतीला 52 टक्के तर महाआघाडीला 33 टक्के मतांचा अंदाज आहे. भाजपला 36 %, शिवसेना 16 %, काँग्रेसला 17%, राष्ट्रवादी 16 %  जागा मिळतील असा अंदाज आहे.

एक्झिट पोलनुसार, भाजपला 123, शिवसेनेला 74, काँग्रेस 40, राष्ट्रवादी 35, मनसे 0 आणि इतरांना 16  जागांचा अंदाज आहे. म्हणजेच महायुतीला 197 तर महाआघाडीला 75 आणि इतरांना 16 जागा मिळतील असा अंदाज आहे.

टीव्ही 9 सिसेरो एक्झिट पोलचा अंदाज 2019

 • भाजपला 123,
 • शिवसेनेला 74,
 • काँग्रेस 40,
 • राष्ट्रवादी 35,
 • मनसे 0
 • इतर – 16

महाआघाडी आणि महायुतीला किती जागा?

 • महायुती – 197
 • महाआघाडी -75
 • इतर – 16
 • एकूण – 288

जागांचा हा अंदाज दुपारपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरुन वर्तवण्यात आला आहे. अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल होईल. हा अंदाज आहे, अंतिम निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर होईल.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

 • भाजप – 122
 • शिवसेना – 63
 • काँग्रेस – 42
 • राष्ट्रवादी – 41
 • मनसे – 1
 • इतर – 19

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI