AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | आप्तेष्टांच्या लग्नात उदयनराजेंची फडणवीसांशी गळाभेट, राज ठाकरेंचीही हजेरी

लग्न सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. लग्नात फडणवीसांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. (Udayanraje Bhosle hugs Devendra Fadnavis )

VIDEO | आप्तेष्टांच्या लग्नात उदयनराजेंची फडणवीसांशी गळाभेट, राज ठाकरेंचीही हजेरी
उदयनराजे भोसले यांच्या आप्ताचा विवाहसोहळा
| Updated on: Mar 06, 2021 | 8:42 AM
Share

नाशिक : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, जयकुमार रावलही उपस्थित होते. (Udayanraje Bhosle hugs Devendra Fadnavis in relatives wedding Raj Thackeray attends)

नाशिक महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे भाजपला टाळी देणार आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या आप्तांच्या लग्नाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांची भेट घेऊन चर्चा करणार का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते.

उदयनराजेंची फडणवीसांशी गळाभेट, पाहा व्हिडीओ

दरम्यान,  लग्न सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. लग्नात फडणवीसांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाणीपुरीचा आस्वाद, पाहा व्हिडीओ

 

विवाह सोहळ्याला राज ठाकरेंची हजेरी, पाहा व्हिडीओ

 

कृष्णकुंजवर जाऊन उदयनराजेंकडून निमंत्रण

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. उदयनराजेंसोबत त्यांचे काही सहकारी होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं. मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने दोघांमध्ये खलबत झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर मनसेच्या ट्विटर अकाऊण्टवरुन ही भेट उदयनराजेंच्या आप्तेष्टांच्या लग्नाच्या निमंत्रणासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. (Udayanraje Bhosle hugs Devendra Fadnavis in relatives wedding Raj Thackeray attends)

नाशिक दौऱ्यात राज ठाकरे राज ठाकरे मनसेच्या निवडक पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

मास्क काढण्याची सूचना

राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

(Udayanraje Bhosle hugs Devendra Fadnavis in relatives wedding Raj Thackeray attends)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.